मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Prathamesh Parab : 'मला घोडा पाहिजे'; नव्या सिनेमाचा ट्रेलर येताच हे काय म्हणतोय प्रथमेश परब?

Prathamesh Parab : 'मला घोडा पाहिजे'; नव्या सिनेमाचा ट्रेलर येताच हे काय म्हणतोय प्रथमेश परब?

prathamesh parab

prathamesh parab

टाइमपास आणि टकाटक 2 नंतर प्रथमेश परबचा नवा सिनेमा येतोय. पण मला घोडा पाहिजे असं का म्हणतोय अभिनेता?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी : टाइमपास 3, टकाटक 2 या सिनेमानंतर अभिनेता प्रथमेश परब चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच त्याच्या  'ढिशक्यांव' या नव्या सिनेमांच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. एकीकडे प्रथमेशच्या लग्नाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे तो सिनेमाचं दणकून प्रमोशन करत आहे. 'मला घोडा पाहिजे' म्हणत प्रथमेशच्या 'ढिशक्यांव' या नव्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  टकाटक आणि टाईमपास 3 प्रमाणेच हा देखील सिनेमा हिट होईल असं दिसत आहे. पुण्यात ढिशक्यांव सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.  प्रथमेशबरोबर अभिनेते संदीप पाठक, अहेमद देशमुख, सैराट फेम सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

'ढिशक्यांव' सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी सिनेमातील सर्वच कलाकारांनी चार चांद लावले. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने चित्रपटात चांगलाच कल्ला केलेला दिसतोय.  या सिनेमाची कथा, पटकथा, संवादाची धुरा लेखक संजय नवगिरे यांनी लिहिली आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहता संदीप पाठक आणि सुरेश विश्वकर्मा यांच्या धम्माल भूमिका पाहाला मिळत आहेत. सुरेशजींनी कमाल व्यक्तिरेखा सिनेमात महत्त्वाची कामगिरी बजावताना दिसणार आहे.

हेही वाचा - Prathamesh Parab : दगडूचं ठरलं! प्रथमेश परब करणार लग्न? तारीख आली समोर

" isDesktop="true" id="822703" >

'ढिशक्यांव' सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी विशेषत: तरुणांनी सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. येत्या 10  फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता प्रथमेश परबच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचं झालं तर 2022वर्षांत 'टाईमपास 3' आणि 'टकाटक 2' सारखे सिनेमे प्रथमेच्या वाट्याला आले. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. वर्षाअखेरीस प्रथमेश परबची छोटी पण महत्त्वाची भूमिका असलेला 'दृश्यम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. नव्या वर्षात 'ताजा खबर' या वेब सीरिजमधून प्रथमेशनं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. 'ढिशक्यांव' सिनेमा फेब्रुवारीत प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे सिंगल नावाचा नवा सिनेमा देखील प्रथमेशनं साइन केला आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news