मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prathamesh Parab : '70MM च्या पडद्यापलिकडील प्रथमेश हा खूप जास्त...'; दगडूच्या कथित गर्लफ्रेंडची खास बर्थ पोस्ट

Prathamesh Parab : '70MM च्या पडद्यापलिकडील प्रथमेश हा खूप जास्त...'; दगडूच्या कथित गर्लफ्रेंडची खास बर्थ पोस्ट

प्रथमेश परब गर्लफ्रेंड

प्रथमेश परब गर्लफ्रेंड

दिवाळीनंतर पुन्हा एकदा दगडूच्या गर्लफ्रेंडच्या चर्चा. प्रथमेशच्या वाढदिवसाला लिहिलेली खास पोस्ट व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 29 नोव्हेंबर : टाइमपासचा हिरो दगडू म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब. टाइमपास असो किंवा टकाटक 2 प्रथमेशच्या सगळ्या सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रथमेशनं मराठी सिनेसृष्टीत स्वत:अशी वेगळी ओळख निर्माण केली. वैयक्तिक किंवा पर्सनल लाइफमध्ये दगडू कायमच स्ट्रगल करत आला आहे. असा प्रथमेश आज त्याचा 29 वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर प्रथमेशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सगळ्या शुभेच्छांमध्ये मात्र एका व्यक्तीच्या शुभेच्छांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. ती व्यक्ती म्हणजेच प्रथमेशची कथित गर्लफ्रेंड. दिवाळीत प्रथमेशनं त्याच्या मैत्रिणीबरोबर फोटो शेअर केलेल होते. त्या फोटोंवरून ती प्रथमेशची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

प्रथमेशच्या वाढदिवशी त्याची मैत्रीण क्षितीजा घोसाळकर हिनं प्रथमेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ज्यात शुभेच्छांबरोबरचं तिच्या आणि प्रथमेशमध्ये असलेल्या क्लोज रिलेशनबद्दलही लिहिलं आहे. तिच्या या पोस्टमुळे पुन्हा एकाद प्रथमेशच्या गर्लफ्रेंडच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

हेही वाचा - Prathamesh Parab: दगडू दादूसला मिळाली रिअल लाईफ प्राजक्ता? प्रथमेशच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा

क्षितिजानं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'हॅप्पी 29Th बर्थ डे मुला. काय लिहु अरे तुझ्याबद्दल! म्हणजे फक्त हॅप्पी बर्थ डे टू यू लिहून सुद्धा विश करता आलं असतं मला, पण तुझं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं आणि त्यातुन आज निमित्त वाढदिवसाचं! मग ही संधी मी कशी बरं सोडेन? गेली अनेक वर्षं मी तुझा अभिनय , डान्स बघतेय, ज्यात तू नेहमीच बेस्ट असतोस. पण अलीकडील काही वर्षे तुझ्यातील अभिनेत्या बरोबरच तुझ्यातील माणूसपण अनुभवतेय!'

तिनं पुढे लिहिलंय, 'फिल्म लहान असो किंवा मोठी, त्यात तुझे सीन्स कमी असोत किंवा जास्त, ते तू मनापासूनच करतोस. प्रचंड बरं नसतानाही शुटींग, प्रमोशन, शुटींग, डान्स हे सगळं तू तितक्याच डेडिकेशनने करतोस. बरं हे सगळं करत असताना कित्येकदा होणारं ट्रोलिंग अजिबात मनावर न घेता किंवा स्वतःची मानसिक स्थिती बिघडवू न देता, ती गोष्ट हसण्यावारी घेऊन तुझ्या कामातून, तुझ्या परफॉर्मन्स मधून एकदम चोख उत्तर देतोस. आणि इतकं सगळं करून सुद्धा कोणत्याही गोष्टीचा तसूभरही गर्व न करता, सतत काहीतरी नवीन शिकण्याचा ( मग ते शून्यापासून का असेना) तुझा अट्टाहास वाखाणण्याजोगा असतो'.

शेवटी लिहिताना क्षितिजानं लिहिलंय,  बऱ्याचदा अभिनेता म्हटलं की त्याच्या ऑनस्क्रिन रोलमुळे तो रिअल लाईफमध्येही तसाच असावा असं पटकन जज केलं जातं. पण 70MM च्या पडद्यापलिकडील प्रथमेश हा खूप जास्त प्युअर आहे, ऑनेस्ट आहे आणि कायम असाच रहा!

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news