ड्रग्जसाठी अस्वस्थ व्हायचा अभिनेता, दोनदा समुपदेशन केंद्रात करावं लागलं भरती

ड्रग्जसाठी अस्वस्थ व्हायचा अभिनेता, दोनदा समुपदेशन केंद्रात करावं लागलं भरती

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्यानं त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. ज्यात त्यानं त्याच्या ड्रग्स घेण्याच्या व्यसनाचाही उल्लेख केला होता.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर आणि बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर याचा आज वाढदिवस. त्याचा जन्मा 28 नोव्हेंबर 1986 मध्ये झाला होता. प्रतिकनं याच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये अभिनेत्री सान्या शंकर हिच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिकनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. ज्यात त्यानं त्याच्या ड्रग्स घेण्याच्या सवयीचाही उल्लेख केला होता.

जेनेलिया डिसूझा आणि इमरान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘जाने तू या जाने ना’मधून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवाक करणारा प्रतिक आता ड्रग्सच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर आला आहे. या सिनेमात त्यानं जेनेलियाच्या भावाची भूमिका साकारली होती. जानेवारीमध्ये लग्न केल्यानंतर प्रतिकनं त्याच्या ड्रग्स घेण्याच्या सवयीविषयी उघडपणे बोलायला सुरुवात केली. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याच्या या सवयीचा स्वतःहून पहिल्यांदा खुलासा केला होता. पण आता मात्र तो यातून पूर्णपणे बाहेर पडला आहे.

Tanhaji सिनेमाच्या अभिनेत्रीचे बिकिनीतील BOLD PHOTO सोशल मीडियावर VIRAL

 

View this post on Instagram

 

#introspect mumbai-saga #mumbaisaga #2020 🙏🏽

A post shared by prateik babbar (@_prat) on

प्रतिक म्हणाला, ड्रग्स घेणं हा माझा वैयक्तिक निर्णय होता. यासाठी मला कोणी जबरदस्ती केली नव्हती. ही सवय, हे व्यसन एका फसलेल्या लग्नाप्रमाणं असते. जर तुम्ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलात तर ती तुम्हाला घाबरवते.

Oops Moment : पॉप सिंगरचा लाइव्ह कॉनसर्टमधील VIDEO VIRAL

विस्कटलेल्या बालपणामुळे लागली ड्रग्स घेण्याची सवय

प्रतिक एके काळी या व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला होता मात्र आता यातून बाहेर पडल्यानंतर त्याला खूप आनंद होत आहे. तो सांगतो, ‘आता मी यातून बाहेर पडलो असून मी माझं सर्व लक्ष फिटनेसवर केंद्रित केलं होतं. यासोबतच मी काही सिनेमाही साइन केले आहेत.’

प्रतिक पुढे म्हणाला, अनेकांना असं वाटतं की, बॉलिवूड कलाकारांनी नशेच्या आहारी जाणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण माझ्यासाठी असं नाही आहे. मला हे व्यसन माझ्या विस्कटलेल्या बालपणामुळे लागली. माझ्या मनात असे अनेक प्रश्न होते ज्यांची उत्तर मला मिळात नव्हती आणि मिळाली नाहीत. याच प्रश्नांपासून दूर पळण्यासाठी मी ड्रग्सचा आधार केला.

दोन वेळा जावं लागलं होतं रिहॅब सेंटरला

असं सांगितलं जातं की, लहान असतानाच प्रतिकच्या आईची म्हणजेच स्मिता पाटील यांचं निधन झालं. त्यानंतर प्रतिकला त्याच्या वडीलांवर खूप राग होता. त्यामुळे त्यानं त्याचं घर सोडलं आणि आपल्या आजीकडे राहायला गेला. मात्र ही नाराजी आणि एकटेपण यांनी त्याची पाठ सोडली नाही. त्यातच त्याला नशा करण्याची सवय लागाली. त्यानं एकेकाळी एवढी नशा केली होती की त्यातून तो मरता-मरता वाचला. हे व्यसन सोडवण्यासाठी त्याला दोन वेळा रिहॅब सेंटरला जावं लागलं होतं.

प्रतिक सांगतो, आपल्याला ड्रग्सचं व्यसन लागलं आहे हे स्वीकारणं सर्वात महत्त्वाच असतं. जेव्हा आपण हे स्वीकारतो त्यावेळी आपण रिकव्हरीकडे पहिलं पाऊल टाकतो. मला याबाबत सर्वांमध्ये जागरुकता निर्माण करायची आहे. मी सध्या एका अशा व्हिडीओवर काम करत आहे. ज्यात या व्यसनाशी झुंजत असलेल्या व्यक्ती एकतर्फी कहाणी नाही तर पूर्ण सत्य दाखवलं जाईल.

VIDEO : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकानं करुन दिली आठवण

========================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 28, 2019, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading