मुंबई, 05 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वादंग उठला आहे. दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी कंगनाबाबत केलेले ट्वीट काल चर्चेत आले होते. आमच्या रणरागिणी कंगनाचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, या सरनाईकांच्या वक्तव्यानंतर महिला आयोगाने त्यांच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कितीही वेळा तुरूंगात जाण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य सरनाईक यांनी केले आहे.
याप्रकरणी शुक्रवारी त्यांनी ट्विटरद्वारे असे म्हटले होते की, 'कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे'.
(हे वाचा-SSR Case : बंटी सजदेहची CBI करणार चौकशी, रोहित-विराटशी आहेत त्याचे जवळचे संबंध)
त्यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी शुक्रवारी प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यावर प्रताप सरनाईकांनी उत्तर दिले आहे. त्यानंतर आणखी एक ट्वीट करत ते म्हणाले आहेत की, 'मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही. भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे'
मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 5, 2020
भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे #आमचीमुंबई
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 5, 2020
यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, 'महिला आयोगाच्या मागणीचे मी स्वागत करतो. महाराराष्ट्राच्या अस्मितेसाठी प्रताप सरनाईक 10 वेळा देखील तुरूंगात जाण्यासाठी तयार आहे. परंतू कंगनासारखी मुर्ख अभिनेत्री महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत बरळते, ज्या मुंबईने तिला एवढ्या मोठ्या स्तरावर नेले आहे त्या मुंबईबद्दल ती अपशब्द वापरत असेल आणि तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत असेल तर अभिनेत्री विरोधात आंदोलन करावेच लागेल आणि ते आम्ही करू.'
(हे वाचा-'...अवमान करून मुंबाआईच्याच पाठीत वार करतात', कंगनावर संतापले आदेश बांदेकर)
ते पुढे म्हणाले की, 'एक गोष्ट खटकते आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षा भाजपाच्या नेत्या आहेत. कंगनाच्या पाठिशी त्या ठामपणे उभ्या आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महिलांवर अत्याचार होतोय, दिवसाढवळ्या खून, लैंगिक शोषण-बलात्कार होत आहेत. परंतू भाजप शासित राज्यांमध्ये लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या एका अभिनेत्रीच्या पाठीशी त्या उभ्या राहत असतील तर मी त्यांचा निषेध करतो.'
(हे वाचा-कंगना भडकली! 'किसी के बाप का नही हैं महाराष्ट्र...उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे?')
कंगनाला मूर्ख म्हणत प्रताप सरनाईक असे म्हणाले आहेत की, 'मी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. मात्र तिला तुरूंगात न नेता ठाण्याच्या मेंटल हॉस्पीटलमध्ये न्यावे' अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 'त्याठिकाणी तिच्यावर चांगले उपचार होतील आणि भविष्यात ती अशी 'टिव टिव' करणार नाही याची जबाबदारी आमचे डॉक्टर घेतील', असे सरनाईक म्हणाले. कंगनाने गेल्या 24 तासात केलेल्या ट्विट्सबाबत बोलताना त्यांनी असे भाष्य केले आहे.