कसा काढला 'पद्मावती'वर तोडगा? सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींचं स्पष्टीकरण

चित्रपटात एकही कट आम्ही सुचवलेला नाही. फक्त 5 बदल सुचवले आहेत. या बदलांशी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक पूर्णपणे सहमत आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2017 10:06 AM IST

कसा काढला 'पद्मावती'वर तोडगा?  सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींचं स्पष्टीकरण

31डिसेंबर : 'पद्मावती' या सिनेमाला यु/ए सर्टिफिकेट देऊन सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा केलाय. सिनेमाचं नाव बदलण्यासह घूमर गाण्यात थोडे बदल करण्याचा तोडगा निर्मात्यांसमोर ठेवण्यात आलाय. या निर्णयाचं बॉलिवूडने स्वागत केलं असलं तरीही सिनेमाला विरोध करणाऱ्या संघटनांना मात्र हा तोडगा मान्य नाही.

याबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जातायेत. त्यावर सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशींनी स्पष्टीकरण दिलंय

''चित्रपटात एकही कट आम्ही सुचवलेला नाही. फक्त 5 बदल सुचवले आहेत. या बदलांशी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक पूर्णपणे सहमत आहेत. 28 डिसेंबर रोजी आम्ही हा चित्रपट पाहिला. सेन्सॉर बोर्डाची तपास समिती आणि विशेष पॅनेलचे सदस्य यासाठी उपस्थित होते. पद्मावतीचा वाद चिघळला होता, आणि निर्मात्यांनीही तज्ज्ञांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचं विशेष पॅनेल आम्ही बनवलं. याआधी 'आरक्षण' आणि 'जोधा अकबर'च्या वेळी तज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. परिस्थिती अभूतपूर्व आणि आव्हानात्मक होती. पण हातातलं काम आम्ही समतोल राखून पूर्ण केलं याचा मला आनंद आहे. ''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 10:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...