प्रशांत दामले करणार पुनश्च हरिओम; नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी

हरहुन्नरी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. ते लवकरच नाटकाचा पुनश्च हरिओम करणार आहेत.

हरहुन्नरी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. ते लवकरच नाटकाचा पुनश्च हरिओम करणार आहेत.

 • Share this:
  मुंबई, 25 नोव्हेंबर: प्रशांत दामलेंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रशांत दामले आता पुनश्च हरिओम करणार आहेत. जबरदस्त टायमिंग, उत्तम संवाद आणि विनोदाची जाण असणारा अभिनेता म्हणून प्रशांत दामलेंचं नाव घेतलं जातं. त्यांनी मंगळवारी एक फेसबुक पोस्ट केली होती त्यात त्यांनी ‘एक मस्त बातमी देणार आहे’ असं लिहिलं होतं त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागली होती. आता त्यांनी आपली बातमी फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनच जाहीर केली आहे. प्रशांत दामले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘आनंदाची बातमी नाटक UNLOCK.. एका लग्नाची पुढची गोष्ट 12 व 13 डिसेंबर पुणे येथे पुनश्च हरिओम’ ही पोस्ट वाचून चाहत्यांना आनंदाचं भरतं आलं आहे. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग लवकरच पुण्यात होणार आहेत. प्रशांत दामले लवकरच स्टेजवर अभिनय करताना दिसणार आहेत. या पोस्टवर काही वेळातच प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नाट्यरसिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर काहींनी नाटक बघायला नक्की येऊ असं वचन दिलं आहे. ‘तुमच्या निर्णयामुळे बॅकस्टेज कर्मचाऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. अनेक रसिकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
  आनंदाची बातमी नाटक UNLOCK "एका लग्नाची पुढची गोष्ट" 12 डिसेंबर व 13 डिसेंबर पुणे येथे पुनःश्च हरी ओम 💃💃💃💃 Posted by Prashant Damle on Tuesday, 24 November 2020
  नाट्यगृह सुरू झाल्यामुळे या व्यवसायाला पुन्हा एकदा उभारी मिळालेली आहे. पण नाट्यगृहात जाताना कोरोनाच्या नियमांचं पालन करणंही तितकंच आवश्यक आहे. प्रशांत दामले जसे उत्तम अभिनेते आहेत तसेच ते माणूस म्हणूनही मोठ्या मनाचे आहेत. लॉकडाऊनच्या काळात बॅकस्टेज वर्कर्सना प्रशांत दामलेंनी आर्थिक मदत केली होती.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: