मुंबई, 29 नोव्हेंबर: झी मराठीवर (Zee Marathi ) 'किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) हा नवीन कुकरी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो वाहिनीवर सादर झाला आहे. यामध्ये अभिनेता संकर्षण म्हणताना दिसतोय की,आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये कस लागणार आहे. आता या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत अस्सल खवय्ये अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle)देखील दिसणार आहेत.
अभिनेता प्रशांत दामले यांची काय भूमिका आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर या कार्यक्रमात प्रशांत दामले हे परिक्षकाच्या भूमिका दिसणार आहेत. कोणते कलाकार पाककलेच्या परिक्षेत अंतिम निर्णय हा प्रशांत दामले घेणार आहेत.
वाचा: नेहा पेंडसेच्या वाढदिवसाच्या पार्टीत पती शार्दूलने असं काही केलं ज्यामुळं... Video व्हायरल
त्यामुळे कलाकारांना आता प्रशांत दामले यांच्या परीक्षेत पास व्हायचे आहे. हा कुकींगशी संबंधीत शो पाहण्यासाठी सर्वंजण उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे अजून या शो मध्ये कोण असणार याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
संकर्षण हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून उत्तम लेखक व कवीदेखील आहे. संकर्षणने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअॅलिटी शो यांच्यामध्ये काम केलं आहे.सध्या संकर्षण झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे. यासोबतच त्याच्या नाटकाचे देखील प्रयोग सुरू झाले आहेत. आता प्रेक्षक त्याला या नव्या भूमिकेत आणि नव्या कार्यक्रमात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यासोबत प्रशांत दामले यांना देखील या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zee marathi serial