मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Coronavirus नाट्यव्यवसाय ठप्प! प्रशांत दामले यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी उचललं मोठं पाऊल

Coronavirus नाट्यव्यवसाय ठप्प! प्रशांत दामले यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी उचललं मोठं पाऊल

कोरोना व्हायरसमुळे चित्रपट व्यवसाय, नाट्यव्यवसाय ठप्प झालेला असताना पडद्यामागच्या कलाकारांच्या मदतीसाठी एक हात पुढे सरसावला आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी ही मदत केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 16 मार्च : कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतामध्ये देखील कोरोनाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. परिणामी याचा फटका यावर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांना बसला आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह यांवरील बंदी उठेपर्यंत संसार कसा चालवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र तेवढ्यातच पडद्यामागच्या या कलाकारांच्या मदतीसाठी एक हात पुढे सरसावला आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी ही मदत केली आहे.

(हे वाचा-पुणेकरांनो,अफवांकडे दुर्लक्ष करा आणि आयुक्तांच्या 'या' सूचनेला गांभीर्याने घ्या)

एक जबाबदार आणि आपल्या सहकाऱ्यांची उत्तम काळजी घेणारे निर्माते प्रशांत दामले यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी सध्या कोरोना मुळे नाट्यव्यवसायावर आलेले सावट पाहता, आपल्या सर्व पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात दिलेला आहे. एकूण 23 जणांना प्रत्येकी 10,000 हजार रुपयांची त्यांनी मदत केली आहे. अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल याची अजून खात्री नाही आहे. पण तोपर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांना दामले यांनी ही मदत देऊ केली आहे.

(हे वाचा- ‘कहो ना...’ विसरून जाल, आता येणार ‘कोरोना प्यार हैं’)

एकीकडे बॉलिवूड त्याचप्रमाणे मराठी चित्रपट इंडस्ट्रीला फटका बसला आहे, मात्र ज्या छोट्या-छोट्या कामगारांमुळे ही इंडस्ट्री चालते, त्यांचा विचार खूप कमी माणसं करतात. त्यामुळे प्रशांत दामले यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आणि सामाजिक जबाबदारीचे भान दर्शवणारा आहे.

First published:

Tags: Coronavirus, Prashant damle