मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'कधी अभिनेता तर कधी व्हिलन'; ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये झळकणार प्रसाद जवादे

'कधी अभिनेता तर कधी व्हिलन'; ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये झळकणार प्रसाद जवादे

प्रसाद जवादे

प्रसाद जवादे

खेर बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित शोला आजपासून सुरुवात होतेय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस'. ग्रॅंडप्रिमिअर सुरु झाला असून स्पर्धकांची नावं हळूहळू समोर येत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 2 ऑक्टोबर : अखेर बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित शोला आजपासून सुरुवात होतेय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस'. ग्रॅंडप्रिमिअर सुरु झाला असून स्पर्धकांची नावं हळूहळू समोर येत आहेत. आज सोशल मीडियावर एकच आवाज घुमत आहे तो म्हणजे 'बिग बॉस मराठी 4'. सगळे प्रेक्षक आतुरतेनं स्पर्धकांच्या नावांची वाट पाहत आहेत.

'बिग बॉस मराठी 4' च्या स्पर्धकांची नावं समोर यायला सुरुवात झाली आहे. अशातच पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. तेजस्विनी लोणारी ही बिग बॉस च्या चौथ्या पर्वात सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. तर दुसरा स्पर्धक प्रसाद जवादे असणार आहे. अभिनेता प्रसाद जवादे बिग बॉस मराठीच्या घरात जाणारा दुसरा स्पर्धक ठरला आहे.

हेही वाचा -  Bigg boss marathi 4 : 'नाद करायचा नाय'; 2022 मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्याची Bigg Boss च्या घरात एन्ट्री

कधी अभिनेता तर कधी खलनायक अशा भूमिका साकारणारा प्रसाद आता बिग बॉसमध्ये कोणत्या अंदाजात दिसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचे चाहते त्याला बिग बॉसमध्ये पाहून खूप उत्सूक आहेत. त्याच्या एण्ट्रीने चाहते कमेंटचा पाऊस करत आहेत.

100 दिवस एकाच घरात राहून हे स्पर्धक कधी एकमेकांची काळजी घेतात तर कधी एकमेकांचा जीव देखील घ्यायला निघतात. त्यामुळे संमीश्र भावना आपल्याा या शोमधून पहायला मिळत असतात. त्यामुळेच हा शो टीआरपी रेसमधील दमदार शो समजला जातो.

दरम्यान, प्रेक्षकांना आता 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीजनची ओढ लागली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संभाळणार आहेत.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment