मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sonelee Kunal Wedding Story: लाडाची मैत्रीण ! सोनाली-कुणालच्या लग्नात 'या' एकमेव अभिनेत्रीनं लावली होती हजेरी

Sonelee Kunal Wedding Story: लाडाची मैत्रीण ! सोनाली-कुणालच्या लग्नात 'या' एकमेव अभिनेत्रीनं लावली होती हजेरी

सोनाली कुणालची वेडिंग स्टोरी प्रदर्शित झाली आहे. सिनेसृष्टीत मोठा फ्रेंडसर्कल असलेल्या सोनलीच्या लग्नात मात्र एकच अभिनेत्री पोहोचली होती. कोण आहे ती अभिनेत्री पाहा.

सोनाली कुणालची वेडिंग स्टोरी प्रदर्शित झाली आहे. सिनेसृष्टीत मोठा फ्रेंडसर्कल असलेल्या सोनलीच्या लग्नात मात्र एकच अभिनेत्री पोहोचली होती. कोण आहे ती अभिनेत्री पाहा.

सोनाली कुणालची वेडिंग स्टोरी प्रदर्शित झाली आहे. सिनेसृष्टीत मोठा फ्रेंडसर्कल असलेल्या सोनलीच्या लग्नात मात्र एकच अभिनेत्री पोहोचली होती. कोण आहे ती अभिनेत्री पाहा.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 13 ऑगस्ट: आपलं लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणारी मराठी सिनेसृष्टीतील एकमेव अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली आणि कुणाल यांची वेडिंग स्टोरी 11 ऑगस्ट रोजी प्लानेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. तीन भागात असलेल्या या सीरिजमध्ये सोनालीनं केलेल्या चार पद्धतीच्या लग्नाची गोष्ट पाहायला मिळत आहे. सोनालीनं तिचं लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यत पोहोचवण्याचा घाट का घातला तर तिचं लग्न कोरोनाच्या काळात झालं.लग्नाला तिचे अनेक मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक पोहोचू शकले नाहीत. कुणालबरोबर केलेल्या पहिल्या लग्नात तर कोणीच नव्हतं मात्र लंडनमध्ये कुणालबरोबर केलेल्या दुसऱ्या लग्नात सोनालीनं तिची सगळी हौस मौज पूर्ण करुन घेतली. दरम्यान सोनालीच्या सोशल मीडियावर देखील तिच्या मित्र मैत्रिणींना लग्नाला बोलावलं नाही म्हणून सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच सोनलीनं देखील माझे कोणीच मित्र मैत्रिणी लग्नाला आले नाहीच याचं दु:ख व्यक्त केलंय.  सोनालीचा सिनेसृष्टीतील मित्र वर्ग फार मोठा आहे. अनेक लाडक्या अभिनेत्रींचा सोनालीच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण सगळ्या लाडक्या मैत्रिणींपैकी केवळ एकच मैत्रीण सोनालीच्या लग्नाला लंडनमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होती. हेही वाचा - Sonalee Kulkarni: 'किती वेळा लग्न करता'; सोनालीच्या वेडिंग स्टोरीने चाहते हैराण
सोनाली कुणालची वेडिंग स्टोरी प्रदर्शित झाल्यापासून  सोनाली लग्नाचे सुंदर सुंदर फोटो शेअर करत आहे. तिच्या सगळ्या फोटोंमध्ये कुलकर्णी आणि बेनोडेकर परिवार दिसत आहे. फोटो आणि सीरिजमधील सगळीच मंडळी नवी आहेत. त्यात सोनाली आणि कुणाल सोडून एक चेहरा ओळखीचा दिसला तो म्हणजे सोनालीची खास मैत्रीण आणि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री 'प्रार्थना बेहरे'. होय अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोनलीची एकमेव मैत्रीण तिच्या लग्नासाठी लंडनला पोहोचली होती. सोनलीनं शेअर केलेल्या लग्नाच्या पहिल्याच फोटोमध्ये मंडपात प्रवेश करताना उजव्या कोपऱ्याच निळी साडी नेसलेली प्रार्थना बेहरे दिसत आहे. लग्नाच्या सगळ्या विधींना प्रार्थना उपस्थित होती हे सीरिजमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. सोनालीच्या अनेक मैत्रिणींना त्यांच्या कामामुळे लग्नाला येणं शक्य झालं नाही. त्यामुळे मुंबईत सोनलीच्या घरी झालेल्या ग्रहमख पूजेला अनेक नातेवाईंकांनी हजेरी लावली होती. तेव्हाही सिनेसृष्टीतील तिच्या मैत्रिणी दिसल्या नाहीत मात्र नृत्यदिग्दर्शिका आणि सोनलीच्या फार जवळची मैत्रीण फुलवा खामकर ग्रहमख पूजेला उपस्थित होती.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Wedding video

पुढील बातम्या