Home /News /entertainment /

प्रार्थना बेहेरे लंडनवरून परतली भारतात, मालिकेच्या सेटवरून शेअर केला खास VIDEO

प्रार्थना बेहेरे लंडनवरून परतली भारतात, मालिकेच्या सेटवरून शेअर केला खास VIDEO

प्रार्थना मागच्या काही दिवसांपासून लंडनमध्ये नवऱ्यासोबत सुट्टयांचा आनंद घेत होती. त्यामुळं तिनं माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता ती लंडनवरून परतली आहे.

  मुंबई, 22 मे- माझी तुझी रेशमीगाठ मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकेत यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. शिवाय सर्वांची लाडकी परी देखील आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते. मागच्या काही दिवासांपासून मालिकेत एक वेगळाच ट्रॅक सुरू आहे. नेहा ऑफीसच्या कामासाठी लंडनला गेली आहे. त्यामुळं प्रेक्षक मालिकेत नेहाला मिस ( mazi tuzi reshimgath latest episode ) करताना दिसत आहे. परी देखील तिच्या आईला मिस करत आहे. नेहाच्या ( prarthana behere ) चाहत्यांसाठी गुडन्य़ूज आहे. नेहा लंडनवरून परतली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे. प्रार्थना मागच्या काही दिवसांपासून लंडनमध्ये नवऱ्यासोबत सुट्टयांचा आनंद घेत होती. त्यामुळं तिनं मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता ती लंडनवरून परतली आहे. सोशल मीडियावर तिनं व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. शिवाय तिनं माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या शुटींगला देखील सुरूवात देखील केली आहे. त्यामुळे चाहत्य़ांच्यात देखील आनंदाचे वातावरण आहे. वाचा-तेजश्री प्रधानला मिळाली नवी मालिका, दिसणार नव्या भूमिकेत प्रार्थना मागच्या काही दिवसांपासून नवऱ्यासोबत लंडन ट्रीपचा आनंद घेत आहेत. तिनं लंडन ट्रीपचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत वारंवार शेअर केले आहेत. असं जरी असलं तरी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील तिचा चाहता वर्ग मालिकेत तिला प्रचंड मिस करताना दिसला. पण प्रार्थनाच्या लंडन ट्रीप मागे एक वेगळं कारण देखील होत.
  प्रार्थनाला तिची मैत्रीण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या दुसऱ्या लग्नात देखील सहभागी व्हायचं होतं. त्यामुळे देखील ती लंडनला गेली होती. आता ट्रीप, सोनालीच लग्न या सगळ्यानंतर ती भारतात परतली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या