'नच बलिये'च्या सेटवर अभिनेत्रीने राहुल महाजनच्या मारलं थोबाडीत, शोच्या आयोजकांनी सांगितलं कारण

'नच बलिये'च्या सेटवर अभिनेत्रीने राहुल महाजनच्या मारलं थोबाडीत, शोच्या आयोजकांनी सांगितलं कारण

कानाखाली मारल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शेवटी निर्मात्यांना याबद्दल खुलासा करावा लागला.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै- भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेत येण्याचं कारण थोडं वेगळं आहे. नच बलियेच्या सेटवर टीव्ही अभिनेत्रीने त्याच्या कानशिलात लगावली. याआधीही राहुलचं नाव अशा वादांमध्ये आलं आहे.

रिहर्सलवेळी अभिनेत्रीने मारली कानाखाली- सध्या नच बलिये 9 च्या प्रीमिअरची रिहर्सल सुरू आहे. शोच्या सेटवर दररोज काही ना काही नव्यानं होतं असतं. या प्रीमिअरमध्ये टीव्ही जगतातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. यात राहुल महाजन आणि टीव्ही अभिनेत्री श्रेनु पारिख ही जोडीदेखील दिसेल.

या शोमध्ये आपला अक्ट करण्यासाठी दोन्ही कलाकार सराव करत होते. मात्र याच सरावा दरम्यान श्रेनुने राहुलच्या कानशिलातच लगावली. कानाखाली मारल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शेवटी निर्मात्यांना याबद्दल खुलासा करावा लागला. श्रेनुने कानाखाली कोणत्या रागाने मारली नसून हा त्यांच्या डान्समधील एक अक्ट होता. तसेच या दोघांचा डान्स प्रीमिअरमध्ये दिसेल असंही सांगण्यात आलं. दोघं सेकंड हँड जवानी या गाण्यावर डान्स करणार आहेत.

सुरुवातीला राहुलला कानाखाली मारण्यासाठी श्रेनु संकोच करत होती. मात्र राहुलने तिला स्वतःहून त्याला कानाखाली मारायला सांगितले. अखेर त्यांच्यात या डानस् प्रॅक्ट्रीस दरम्यान मैत्रीही झाली.

फक्त 8 मिनिटांच्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रभासवर खर्च केले तब्बल एवढे कोटी रुपये!

समीराने शेअर केला मुलीचा पहिला फोटो आणि भावुक होऊन लिहिली ही पोस्ट

कतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा

कोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल

Tags:
First Published: Jul 16, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading