Home /News /entertainment /

The Kashmir Files च्या यशामुळे पोटात दुखले का? प्रकाश राज यांच्या खोचक ट्वीटमुळे नेटकऱ्यांचा संताप

The Kashmir Files च्या यशामुळे पोटात दुखले का? प्रकाश राज यांच्या खोचक ट्वीटमुळे नेटकऱ्यांचा संताप

Prakash Raj

Prakash Raj

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ ( The Kashmir Files ) या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, दाक्षिणात्य आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी खोचक ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 मार्च: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ ( The Kashmir Files ) या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजकारण्यांसह आता सेलेब्रेटीजदेखील या चित्रपटावर सवाल उपस्थित करत आहेत. नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे दाक्षिणात्य आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी खोचक ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला आहे. प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या एका ट्विटमध्ये, ‘प्रिय अभिनेते, जे आता निर्माते झाले आहेत.. तुम्ही या फाईलींनाही ट्विस्ट देऊन चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित करणार का?’ या ट्विटमध्ये त्यांनी ‘गोध्रा फाईल्स, दिल्ली फाईल्स, जीएसटी फाईल्स, नोटाबंदी फाईल्स, कोव्हिड फाईल्स, गंगा फाईल्स’, अशी नावं लिहिण्यात आली आहेत. या ट्विटद्वारे त्यांनी विवेक अग्निहोत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. तसेच या पूर्वी त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा प्रचारकी थाटाचा चित्रपट आहे. तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय,’ असा सवाल करणारा एक व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. नेकऱ्यांनी केलं ट्रोल प्रकाश राज यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 'चित्रपटाचे यश पाहून वाईट वाटत आहे का? असा सवाल केला आहे. सर कोणी 'शेमलेस' म्हटले आहे चित्रपटात काय दाखवले आहे असे तुम्हाला वाटते? सत्य घटनेवर आधारित तुमचा एखादा चित्रपट सांगा?' तर कोणी प्रकाश राजवर बहिष्कार घाला. असे म्हटले आहे. वादाच्या भोवऱ्यात इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandits) बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काश्मिरी पंडितांची हत्या केल्याच्या घटना जरी सत्य असल्या तरी याच काळात काश्मिरी मुसलमानांचीही हत्या करण्यात आली होती, त्याबद्दल या चित्रपटात काहीही म्हटलेलं नाही, असा आरोपही दिग्दर्शकांवर होत आहे. द काश्मीर फाईल्समध्ये काय दाखवण्यात आले आहे 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांच्यासह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या