• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • प्राजक्ता माळीनं सुरु केलं योग! पिंचमयूरासनचा VIDEO शेअर करत सर्वांनाच केलं चकित

प्राजक्ता माळीनं सुरु केलं योग! पिंचमयूरासनचा VIDEO शेअर करत सर्वांनाच केलं चकित

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती योग शाळेमध्ये आल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने स्वतः कॅप्शनमध्ये हे म्हटलं आहे, की तब्बल ८ महिन्यानंतर ती योग शाळेत परतली आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर-  अलीकडच्या काळात फिटनेस  (Fitness)  ही सर्वात मोठी बाब बनली आहे. आज प्रत्येक व्यक्ती आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. त्यासाठी योग, कार्डिओ, सायकलिंग असे विविध मार्ग अवलंबत आहे. यामध्ये कलाकारांचा क्रमांक सर्वात वर लागतो. कलाकार स्वतःला फिट आणि ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देत असतात. नुकताच मराठमोळी अभिनेत्री  (Marathi Actress)   प्राजक्ता माळीने  (Prajkta Mali)  आपला एक व्हिडीओ शेअर  (Video)  केला आहे. यामध्ये ती चक्क अष्टांगयोगा करताना दिसत आहे.
  अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती योग शाळेमध्ये आल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने स्वतः  कॅप्शनमध्ये हे म्हटलं आहे, की तब्बल ८ महिन्यानंतर ती योग शाळेत परतली आहे. परत येतं प्राजक्ताने विविध थक्क करणारे योग करायला सुरवात केली आहे. नुकताच अभिनेत्रीने आपल्या व्हिडीओमध्ये अष्टांगयोग करून दाखवला आहे. अभिनेत्रीचं हे कसब पाहून चाहते थक्क झाले आहेत. व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करून तिचं कौतुक करत आहेत. तसेच अनेकांनी प्राजक्ताने असे मोटिवेशनल पोस्ट सतत शेअर कराव्या अशी मागणीसुद्धा केली आहे. अभिनेत्रीने २ दिवसांपूर्वीसुद्धा आपला एक व्हिडो शेअर केला होता. यामध्ये ती पिंचमयूरासन करताना दिसत होती. खाली डोकं वर पाय यानुसार तो योग प्रकार आहे. अभिनेत्रीला इतकं कठीण प्रकार करताना पाहून चाहते थक्क झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
  अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने विविध भूमिका साकारत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीने मालिकांपासून सुरुवात करून मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत आपली मजल मारली आहे. झी टीव्हीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसेच मालिकेमुळे अभिनेत्रीला एक खास ओळख मिळाली होती. त्यानंतर याच वाहिनीवर ती 'नकटीच्या लग्नाला यायचं हा' या विनोदी मालिकेत झळकली होती. हि मालिकासुद्धा फारच पसंत केली गेली होती. (हे वाचा:'आता पद्म पुरस्कार येणार..', स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंवर निशाणा) त्यांनतर अभिनेत्रीने आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवला होता. प्राजक्ताने सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकरसोबत 'हंपी' हा चित्रपट केला होता. यामधील तिच्या बिनधास्त भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच प्राजक्ता ही फक्त अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्तम होस्टसुद्धा आहे. ती सतत विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसू येते. गेली अनेक वर्ष ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या विनोदी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. यामध्ये तिला प्रचंड पसंत केलं जातं आहे. सोबतच अभिनेत्री आपल्या युट्युब चॅनेलद्वारे विविध व्हिडिओ करून चाहत्यांना अनेक टिप्स देत असते. प्राजक्ता एक कवयित्रीसुद्धा आहे. नुकताच तिने आपला कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संर्पकात असते.
  Published by:Aiman Desai
  First published: