प्राजक्ता माळी सायकलवर निघाली युरोपला!

प्राजक्ता माळी सायकलवर निघाली युरोपला!

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खूश आहे. याचं कारण ती निघालीय युरोपला. तेही सायकलवर.

  • Share this:

'जुळुनी येती रेशीमगाठी' मालिकेतली प्राजक्ता माळी सगळ्यांना माहीत आहे. सध्या 'ती' काय करतेय, असा तिच्या फॅन्सना प्रश्न पडला असेल, तर त्याचं उत्तर आमच्याकडे आहे.

प्राजक्ता युरोपला निघालीय. पण ही सफर खास आहे. कारण ती युरोपचे देश सायकलवर फिरणार आहे.

सीवायसीनं पहिल्यांदाच ही ट्रिप आयोजित केलीय, प्राजक्ता सांगत होती. सात सात दिवसांच्या अशा दोन टुर्स आहेत आणि प्राजक्ता अँबेसिडर म्हणून या टुरमध्ये सायकल चालवत देश पाहणार.

या टुरमध्ये प्राजक्ता बुडापेस्ट,व्हिएन्ना असे देश फिरणार. ज्या देशांमध्ये सायकल ट्रॅक सुरक्षित आहे, असे देशच निवडलेत. दोन टुर्स एका वेळी निघणार. एकामध्ये चार देश तर दुसऱ्यामध्ये तीन देश आहेत. प्राजक्ता या दोन्ही टुर्स करणारआहे.

या टुरमध्ये अभिनेता संतोष जुवेकरही आहे. युरोपच्या देशांमधली गावं, निसर्ग, काॅफी शाॅप्स सगळं एंजाॅय करत प्राजक्ता सायकलस्वारी करणार आहे.

प्राजक्ता या युरोप सफरीसाठी खूपच उत्सुक आहे. प्रत्येकाला नकाशा देणार, हाॅटेलचा पत्ता देणार...तुम्ही तुमचे तुमचे एंजाॅय करत ठरलेल्या ठिकाणी पोचायचं. म्हणजे काहीच बंधन नाही. ही टुर मेमध्ये निघणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 04:19 PM IST

ताज्या बातम्या