मुंबई, 15 डिसेंबर: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. माझी आई काळुबाई मालिकेचा वाद असो किंवा खंडेरायाची खंडा तलवार उचलणं असो. तिने पोस्ट केलेल्या अनेक गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होत असते. आताही प्राजक्ता गायकवाड एका भन्नाट व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये साडी, नथ, आंबाडा या वेशात ती चक्क व्यायाम करताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिने स्वत: हा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचं बरंच कौतुक केलं आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्राजक्ता पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. नथ, आंबाडा असा साज-श्रृंगार तिने केलेला आहे आणि त्यातही ती चक्क वर्कआऊट करताना दिसत आहे. एका जीमच्या उद्घाटनाला गेलेली असताना तिने तिथे हे वर्कआऊट केलेलं दिसत आहे. या व्हिडीओसोबत तिने एक कॅप्शनही दिलं आहे, ‘तुमच्या मर्यादांना पार करुन पुढे जा’ असं ती म्हणते. खऱ्या आयुष्यातही प्राजक्ता फिटनेसबद्दल अतिशय जागृक आहे. शूटिंग आणि अभ्यास यातून वेळ काढत ती रोज व्यायामही करते.
View this post on Instagram
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad) महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. प्राजक्ता गायकवाड सध्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. माझी आई काळूबाई मालिकेला रामराम ठोकल्यानंतर तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. प्राजक्ता आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार? याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.