मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अचानक असं काय झालं ज्यामुळं प्राजक्ताला हिमाचल प्रदेशमधून पळून यावं असं वाटतंय.., अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

अचानक असं काय झालं ज्यामुळं प्राजक्ताला हिमाचल प्रदेशमधून पळून यावं असं वाटतंय.., अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

 मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी तिच्या ट्रीपचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. एकूण काय ती धमाल करत आहे. मात्र आता तिला त्या ठिकाणाहून पळून यावं असं वाटत आहे.

मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी तिच्या ट्रीपचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. एकूण काय ती धमाल करत आहे. मात्र आता तिला त्या ठिकाणाहून पळून यावं असं वाटत आहे.

मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी तिच्या ट्रीपचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. एकूण काय ती धमाल करत आहे. मात्र आता तिला त्या ठिकाणाहून पळून यावं असं वाटत आहे.

  मुंबई, 9 जून- प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मागच्या काही दिवासंपासून प्राजक्ता माळी (Prajaktta Mali latest news ) तिच्या वेबसिरीजचे प्रमोशन तसेच हास्यजत्रेचे शुटींग यात व्यस्थ आहे. आता तिनं चक्क हास्य़जत्रेतून सुट्टी घेतली आहे. प्राजक्ता सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहे. पहिल्यांदाच ती एकटी फिरायला गेली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ती सुट्टयांचा आनंद घेत आहे. मागच्या काही दिवसांपासून ती तिच्या ट्रीपचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. एकूण काय ती धमाल करत आहे. मात्र आता तिला त्या ठिकाणाहून  पळून यावं असं वाटत आहे. तिनं पोस्ट लिहित याबद्दल सांगितलं आहे. सध्या तिची पोस्ट चर्चेत आहे. प्राजक्ता माळीनं तिच्या ट्रीपचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, Not so hippy but liking the Parvati Valley…. Tosh village 🏔(near Kasol- Himachal Pradesh)#trek #tosh #kasol #hippy#overdose of #oxygenपण खर सांगू., वाचा-श्रेया बुगडेला जडलंय या गोष्टीचं महाभयंकर व्यसन, काही केलं तरी सुटता सुटेना कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीक जास्त 5-6दिवस आनंद घेऊ शकते नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण यायला लागते…हो आत्ता पळून यावं; इतकी आठवण येतेय… देवा…कसं होणार माझं… 😥#महाराष्ट्राचीमूलगी #सह्याद्रीचीलेक #prajakttamali @🏔 ...तिला आता महाराष्ट्राची, घराची व तिच्या कामची आठवण यायला सुरूवात झाल्याचे या पोस्टवरून दिसत आहे. वाचा-श्रुती मराठेला अति कॉनफिडन्स नडला! नवऱ्यासमोर गाणं गाताना झालं असं काही.. आधी 'जुळून येती रेशीमगाठी' मधून तिने प्रेक्षकांना आपलेसे केले आणि आता महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ‘व्वा दादा व्वा’ करत तीन सर्वांच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा आणत आहे. अशी गोड आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. प्राजक्ताने फार कमी प्रोजेक्ट्स केले आहेत पण तिने जेवढी कामे केली आहेत तेवढी हिट ठरली आहेत आणि म्हणूनच मराठी प्रेक्षकांमध्ये ती जास्त लोकप्रिय आहे.
  अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajaktta Mali ) मागच्या काही दिवसांपासून तिच्या रानाबाजार या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. रानबाजारमधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक झालं. पण नेटकऱ्यांना तिचा बोल्ड अंदाज रूचला नाही. यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता प्राजक्ता माळी पुन्हा एक नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. प्राजक्ता माळी वाय सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते तिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या