Home /News /entertainment /

'एक अभिनेत्री म्हणून..' बर्डथे गर्ल तेजस्विनीसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट

'एक अभिनेत्री म्हणून..' बर्डथे गर्ल तेजस्विनीसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट

आज अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Happy Birthday Tejaswini Pandit ) हिचा वाढदिवस आहे. तिची रानबाजारमधील कोस्टार अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (prajakta mali ) देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच फोटो देखील शेअर केले आहे

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 मे- मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानबाजार (RaanBaazaar ) ही मराठी वेबसिरीज चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी भूमिकेत दिसत आहेत. आज अभिनेत्री तेजस्विनी पंडित  (Happy Birthday Tejaswini Pandit ) हिचा वाढदिवस आहे. चाहत्यांसह सेलेब्सकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिची रानबाजारमधील कोस्टार अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (prajakta mali ) देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच  फोटो देखील शेअर केले आहेत. प्राजक्ता माळीनं तेजस्विनी पंडित हिच्यासोबतचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तेजस्विनी पंडित♥️♥️♥️मी भाग्यवान आहे की मला तुझ्यासोबत #RaanBaazaar या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली.. एक अभिनेत्री म्हणून तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे...🌟अशीच उंच भरारी घे आणि आम्हाला प्रेरणा देत राहा..अशी काहीशी खास पोस्ट प्राजक्ताने तेजस्विनी पंडितसाठी लिहिली आहे. वाचा-Hbd Tejaswini:बोल्ड आणि बिंधास्त तेजूने एकेकाळी अडीच महिने काढले अंधारात... रानबाजार या सिरीजच्या ट्रेलरपासून (RaanBaazaar Trailer) अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीला नेटकऱ्यांनी जबरदस्त ट्रोल ( Tejaswini Pandit Troll )केलं आहे. सिरीज रिलीज झाल्यानंतर देखील हे ट्रोलिंग थांबलं नाही. मात्र एककीडे तेजस्विनी आणि प्राजक्ता माळी ट्रोल होत असल्या तरी दुसरीकडं या दोघींच्या अभिनयाचं कौतुक देखील होत आहे. या दोघींनीही वेगळ्या साच्यातील भूमिका या सिरीजमध्ये साकारल्या आहेत. यासाठीच या दोघींचे कौतुक देखील होत आहे.
  तेजस्विनीने साकारलेल्या सिंधुताई सपकाळ आजही अनेकांना प्रेरणा देतात. या चित्रपटात सिंधुताईंच्या तरुणपणीची भूमिका तेजस्विनीने तर मोठेपणीची भूमिका तिची आई ज्योती चांदेकर यांनी साकारली आहे. स्वतःला चॅलेंज देत प्रेक्षकांना दरवेळी काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न तेजस्विनी करत आली आहे.तिने स्वबळावर चालू केलेला तेजाज्ञा ब्रँड असुदे किंवा अगदी आत्ता तिने निर्मिती क्षेत्रात केलेलं पदार्पण असुदे वेगवेगळ्या भूमिकांमधून ती समोर येते आणि तिच्या प्रत्येक कामात ती यशस्वी होते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या