मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta Mali : 'आधी रोष मग केलं असं काही...', प्राजक्ता माळीच्या लंडनवारीची होतेय जोरदार चर्चा

Prajakta Mali : 'आधी रोष मग केलं असं काही...', प्राजक्ता माळीच्या लंडनवारीची होतेय जोरदार चर्चा

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी लंडनचं शुटींग संपवून भारतात यायला निघाली आहे. प्राजक्तानं तिच्या मनात लंडनबद्दल असलेला रोष व्यक्त केला होता. पण लंडन सोडताना प्राजक्तानं सर्वांची मनं जिंकली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 30 सप्टेंबर : सध्या अनेक मराठी कलाकार लंडनमध्ये सिनेमाचं शुटींग करत आहेत.  अभिनेत्री प्राजक्ता माळीही नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनमध्ये पोहोचली होती. 10-15 दिवस प्राजक्ता लंडनमध्ये शुट करत होती. अभिनेता ऋषिकेश जोशी,संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्त्ववादी, आलोक राजवाडे यांच्यासह प्राजक्ता लंडनमध्ये शुटींग करत होती. शुटींगचं शेड्यूल संपवून प्राजक्ता पुन्हा भारतात यायला निघाली आहे. असं असलं तरी लंडनमध्ये प्राजक्ताला काही करमत नव्हतं. लंडनविषयीचा मनातील रोषही तिनं व्यक्त केला. पण तिथून निघताना मात्र प्राजक्तानं जे काही त्यामुळे तिच्या लंडनवारीची चांगलीच चर्चा होतेय.

प्राजक्ताला लंडनमध्ये गेली खरी पण तिथं फार काळ ती रमू शकली नाही. कामासाठी आले म्हणून नाहीतर 4 दिवसात धूम ठोकली असली असं म्हणत लंडनवरील रोष प्राजक्तानं व्यक्त केला होता.  'ने मजसी ने परत मातृभीला…सागरा प्राण तळमळला…', या स्वातंत्र्यवीर सावकरांच्या ओळी लिहीत म्हटलं होतं, 'भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही.

त्याला अनेक कारणं आहेत'. वाचा प्राजक्ताची सविस्तर पोस्ट

हेही वाचा - Prajatka Mali: कामासाठी आले नसते तर 4 दिवसात परत...; विदेशात गेलेली प्राजक्ता असं का म्हणाली?

लंडन संपूर्ण फिरल्यानंतर आपला भारत देश किती महान आहे हे पदोपदी जाणवल्याचं प्राजक्तानं म्हटलं होतं. मी भारत देशात जन्माला आले यासाठी मी देवाचे किती आभार मानू असंही तिनं म्हटलं होत.

प्राजक्तानं लंडनहून निधताना मात्र लंडनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.  लंडनमधील फोटो शेअर करत प्राजक्तानं पोस्ट शेअर केली आहे. तिनं म्हटलंय, 'वरवर कितीही रोष आहे असं वाटलं, लिहीलं नाही लिहीलं; तरी मुळाशी 'कृतज्ञता' आहेच. कारण भारतीय संस्कृतीनं शिकवलयं 'वसुधैव कुटूंबकम्'.

प्राजक्ताच्या या पोस्टमधून तिचा स्वभाव आणि विचार करण्याची दृष्टी समोर आली आहे. सोबतचं तिनं 'हे विश्वची माझे घर', असा हॅशटॅगही शेअर केला आहे. या पोस्टमुळे प्राजक्ताचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news