मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta Mali: मेणबत्या न लावता प्राजक्ताने साजरा केला वाढदिवस; VIDEO शेअर करत सांगितलं कारण

Prajakta Mali: मेणबत्या न लावता प्राजक्ताने साजरा केला वाढदिवस; VIDEO शेअर करत सांगितलं कारण

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ प्राजक्तानं शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ प्राजक्तानं शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ प्राजक्तानं शेअर केले आहेत.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 10 ऑगस्ट: 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता सिनेमा आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे. रानबाजार सारखी तगडी वेब सीरिज करुन प्राजक्तानं तिची नवी छाप प्रेक्षकांवर पाडली. प्राजक्ता आता महाराष्ट्राची  हास्यजत्रामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच महाराष्ट्राच्या लाडकी अभिनेत्रीनं प्राजक्ता माळीनं नुकताच 8 ऑगस्टला तिचा वाढदिवस साजरा केला. फॅमिली मित्र मैत्रिणींबरोबर प्राजक्तानं तिचा दिवस आनंदात घालवला. सिनेसृष्टीतून तसेच सोशल मीडियावरुन प्राजक्तावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. दरम्यान प्राजक्ताच्या बर्थ सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत. प्राजक्तानं तिच्या वाढदिवसाला मेणबत्या न लावता वाढदिवस साजरा केला. तिनं असं का केलं याचं कारण देखील तिनं सांगितलं. यंदाचं वाढदिवस प्राजक्तासाठी खास होता कारण दमदार वेब सीरिज आणि सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरुन प्रतिसादही दिला. त्यामुळे प्राजक्ता सध्या प्रचंड खूश आहे. तिचा आनंद आणखी द्विगुणीत करण्यासाठी तिचा मित्र परिवार तिच्या घरी पोहोचला आणि प्राजक्ताला त्यांनी अनोख सप्राइज दिलं. प्राजक्तानं सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम, विकास पाटील, दिग्दर्शक प्रताप फड दिसत आहे. सगळ्यांनी प्राजक्तासाठी छान केक आणला आहे. मात्र मेणबत्या न विझवता मित्रांनी प्राजक्ताचं औक्षण केलं. औक्षण केल्यानंतर तिच्याकडून त्यांनी दक्षिणा देखील मागितली आहे.  मित्रांची धम्माल प्राजक्तानं व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे. हेही वाचा - 'स्टारडम म्हणजे काय?', प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर गिरगावच्या दहीहंडीचा 'तो' किस्सा आला समोर प्राजक्तानं पोस्ट शेअर करत म्हटलंय, 'मित्रांनी मेणबत्या न लावण्याचा आणि औक्षण करण्याचा हट्ट धरला, मलाही तो आवडला. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा रूपात खूप प्रेम मिळालं. कृतज्ञ. खूप धन्यवाद. असेच आशिर्वाद पाठीशी राहू द्यात'.
वाढदिवसाच्या दिवशी प्राजक्ताला अनेक शुभेच्छा येत होत्या मात्र सगळ्यांना थँक्यू म्हणणं तिला जमलं नाही. तिनं म्हटलंय, 'जास्तीत जास्त कॅाल्स , मेसेजेस् ना उत्तरं द्यायचा, सोशल मीडिया टॅग्सना उत्तर द्यायचा प्रयत्न केला. तरी जे नजरचुकीनं राहीले त्यांनी माफी द्यावी व लोभ कायम ठेवावा. तुम्हां सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड चांगल्या कामाने करण्याचा प्रयत्न करेन'. फक्त मित्र मैत्रिणीच नाही तर प्राजक्तानं तिची फॅमिली, एक्सटेंडेट फॅमिलीबरोबर दोन वेगळेगळ्या शहरात तिचा वाढदिवस साजरा केला. प्राजक्तानं सगळ्यांबरोबरचे फोटो शेअर केले आहे. अभिनेत्रीनं तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपल्या माणसांबरोबर शेअर केला. प्राजक्तानं पोस्ट शेअर करत  तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार देखील मानलेत.
First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या