मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री प्राजक्ता माळी एक गुणी अभिनेत्री आहे. ती कायम चर्चेत असते. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच तिचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. प्राजक्ता तिच्या कुटुंबाशी कायम जोडलेली दिसते. ती बऱ्याचदा कुटुंबसोबत वेळ घालवताना दिसते. तिच्या भाच्यांचे फोटो ती शेअर करत असते. तिच्या या गोष्टीमुळे चाहते तिचं नेहमी कौतुक करतात. या गोष्टींमुळेच प्राजक्ता चाहत्यांची लाडकी आहे. नुकतंच तिने तिचा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
यावर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आज बाप्पाचं विसर्जन होत असलं. तरी या 10 दिवसांत सर्वसामान्य लोकांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनीच ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील कलाकार एकत्र पाहायला मिळाले. प्राजक्ताने देखील मुख्यत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्याबद्दल पोस्ट शेअर करत तिने आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - Bollywood singer : प्रसिद्ध गायकाला घटस्फोट घेणं पडलं महागात; पत्नीला द्यावी लागली इतक्या कोटींची पोटगी
प्राजक्ताने लिहिले आहे कि, “वर्षा” बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे…परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला…''
View this post on Instagram
तसेच तिने मुख्यत्र्यांचे आभार देखील मानले आहेत. तिने पुढे लिहिलंय कि, ''आम्हासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, मा. श्रीकांतजी शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार…''
अलीकडेच प्राजक्ता माळी 'रानबाजार' या वेब सीरिज मधील भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली होती. तिचे या भूमिकेसाठी कौतुक झाले होते. त्यानंतर आलेल्या 'वाय' या सिनेमात देखील प्राजक्तानं महत्वाची भूमिका निभावली होती. प्राजक्ता आता टेलिव्हिजनवर हास्यजत्रेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय आगामी काळातही तिचे प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. याविषयी अभिनेत्री वेळोवेळी चाहत्यांना अपडेट्स देत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.