मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta mali : 'हे भाग्य सगळ्यांना थोडीच लाभतं'; असं का म्हणतेय प्राजक्ता माळी?

Prajakta mali : 'हे भाग्य सगळ्यांना थोडीच लाभतं'; असं का म्हणतेय प्राजक्ता माळी?

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आयुष्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम फार महत्त्वाचा भाग आहे.आज महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमासाठी प्राजक्तानं खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आयुष्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम फार महत्त्वाचा भाग आहे.आज महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमासाठी प्राजक्तानं खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आयुष्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम फार महत्त्वाचा भाग आहे.आज महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमासाठी प्राजक्तानं खास पोस्ट शेअर केली आहे.

  मुंबई, 19 ऑगस्ट:  संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. प्राजक्ता नेहमीचं तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.  महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून प्राजक्ता एक सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि 'वा दादा वा' म्हणत तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. कोरोनाच्या काळातही हास्यजत्रेच्या कलाकारांनी घरी राहून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्राजक्ताच्या आयुष्यातही हास्यजत्रा हा कार्यक्रम फार महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमामुळे प्राजक्ताला एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येता आलं. प्रेक्षकांनीही प्राजक्ताला हास्यजत्रेमधून खूप प्रेम दिलं.  ज्या कार्यक्रमामुळे प्राजक्ताची नवी इनिंग सुरू झाली त्या कार्यक्रमाला म्हणजेच महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला आज 4 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्तानं प्राजक्तानं खास पोस्ट शेअर केली आहे. आजच्या दिवशी सोनी मराठी या वाहिनीनं टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. वाहिनी सुरू झाली त्याच दिवशी महाराष्ट्राची हास्यजत्राही सुरू झालं.  प्राजक्तानं हास्यजत्रेत खूप धम्माल केली आहे. अगदी स्क्रिप्ट रिडिंगपासून कॉस्ट्युमपर्यंत. अनेक उत्तमोत्तम कालाकारांबरोबरही प्राजक्ताला काम करण्याची संधी मिळाली. हास्यजत्रेतील प्राजक्तानं फोटोशूट म्हणजेच सर्वांच्याच चर्चेत विषय असतो. प्राजक्ता स्वत:ही तिच्या कपड्यांच्या प्रेमात असते. हेही वाचा - Mukta Barve: स्वप्नील जोशीमुळे मुक्ताला आयुष्यात परत मिळाली 'ही' गोष्ट, अभिनेत्रीनं केला खुलासा
  हास्यजत्रेला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्राजक्तानं पोस्ट शेअर करत म्हटलं, 'आज महाराष्ट्राची हास्यजत्रेला 4 वर्ष पूर्ण झाली.  इतकं प्रेम आणि इतरांना हसवण्याचं भाग्य सगळ्यांना थोडीच लाभतं? सदैव कृतज्ञ. आजही मला माझ्या हास्यजत्रेच्या शुटींगचा पहिला दिवस लख्ख आठवतोय आणि आजही पहिल्या कॉस्ट्युमचा फोटो गॅलरीमधून हटवला नाहीये. सोनी मराठीलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. हास्यजत्रेच्या टीमबरोबर असं काम करत राहू'. या पोस्टसह प्राजक्तानं महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या पहिल्या एपिसोडला घाललेल्या ड्रेसचा फोटो देखील शेअर केला आहे. तिची ही पोस्ट फोटो पाहून चाहत्यांची कौतुक केलंय. एका चाहत्यानं म्हटलंय, 'सर्वांचं अभिनंदन.  अशीच प्रेंसेससारखी येतं रहा आणि खूप हसवणारे एपिसोड सुद्धा येतं राहवेत'. तर दुसऱ्या चाहत्यानं म्हटलंय, 'असेच हास्य जत्रेचा मुख्य भाग बाऊन रहा. आचार्य अत्रेंच्या भाषेत संगयचे तर पुढची १० हजार वर्षे लोकांचे १०० वर्षे आयुष्य वाढवा'. तर आणखी एका चाहत्यानं प्राजक्ताचं मनभरुन कौतुक करत म्हटलंय, 'अँकरिंग आणि ग्लॅमरसची राणी आणि मराठी पारंपारिक आणि आधुनिक दिसणारी भव्य राणी'.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या