मुंबई, 23 मार्च- अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच तिच्या कामाबद्दल अपडेट शेअर करत असते. प्राजक्ता सध्या सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करताना दिसते. आता लवकरच प्राजक्ता एका नवीन प्रोजेक्टमध्ये नवीन भूमिकेत दिसणार आहे.
सोनी मराठीवरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत प्राजक्ताची एंट्री होणार आहे. तब्बल 6 वर्षांनी ती मालिकेत पुनरागमन करते आहे. पारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरणार आहे. पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात नवीन एंट्री झाल्यामुळे आणखीन काय पाहायला मिळणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. सोनी मराठीनं प्राजक्ता माळीच्या या दमदार एंट्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत असं म्हटलं आहे की, दिसायला गोड, स्वभावाने कडक, पोस्ट ऑफीसमध्ये पूजा येणार बेधडक! पाहा,'पोस्ट ऑफीस उघडं आहे.....' गुरु - शनि, रात्री 9 वाजतासोनी मराठी वाहिनीवर... प्राजक्ताच्या चाहत्यांनी देखील या व्हिडिओवर कमेंट करत तिाल नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.
हृतिक रोशनच्या वडिलांचे सर्व सिनेमे K वरुनच होतात सुरु, डोक्यावर ठेवत नाहीत केस
View this post on Instagram
प्राजक्ता माळीचा मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावर वावर वाढला आहे. तीची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. मध्यंतरी प्राजक्तानं नवीन व्यवसाय सुरू केला आहे. प्राजक्तराज या नावाने तिनं पारंपरिक दागिन्याचा व्यवसाय सुरू केला आहे. प्राजक्ताच्या या दागिन्यांना मागणी देखील चांगली आहे. प्राजक्ता तिच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये हे दागिने घालताना दिसते.
याशिवाय मागच्या काही दिवसात तीला राजकीय मंचावर पाहून अनेकांनी ती राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाले. पण प्राजक्तानं वेळीच या चर्चांना पूर्णविराम दिला होता. . प्राजक्ता माळी श्री श्री रवीशंकर यांना आपले गुरू मानते. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्तं ती बिझी शेड्यूलमधून वेळ काढून श्री श्र रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली होती.प्राजक्ताचा कॉमेडी सेन्स देखील चांगला आहे. अनेकवेळा ती हास्यजत्रेमधील कलाकारांसोबत विनोद रंगवताना दिसते. आता तिला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत.
प्राजक्तानं जुळून येती रेशीमगाठी, बंध रेश्माचे, सुवासिनी, सुगरण, गाणे तुमचे आमचे या टीव्ही शोमध्ये अभिनयाची झलक दाखवली आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं निवेदन करताना दिसते. प्राजक्तानं मराठी सोबत हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली भाषेत देखील अभिनय केला आहे. तिला फिरायला खूप आवडते. अनेकदा ती तिच्या ट्रीपचे फोटो शेअर करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.