मुंबई, 1 फेब्रुवारी- 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. यामधून अनेक कलाकार लोकप्रिय झाले आहेत. सोबतच या कलाकारांमध्ये छान मैत्रीसुद्धा पाहायला मिळते. अशाच दोन मैत्रिणी म्हणजे प्राजक्ता माळी आणि वनिता खरात होय. या कार्यक्रमात वनिता स्पर्धक आहे. प्राजक्ता माळी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसून येते. वनिता खरात उद्या लगबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी प्राजक्ताने आपल्या लाडक्या मैत्रिणीला खास गिफ्ट दिलं आहे. पाहूया प्राजक्ताने दिलंय.
प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. प्राजक्ताने मालिकांपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आपल्या पहिल्याच मालिकेमुळे प्राजक्ताला अफाट लोकप्रियता मिळाली होती. आज प्राजक्ता चित्रपटांमधून मोठा पडदा गाजवत आहे.शिवाय अभिनेत्रीने स्वतः चं ज्वेलरी ब्रँड सुरु करत उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर दुसरीकडे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे वनिता खरातला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. तीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान गेल्यावर्षी वनिताने न्यूड फोटोशूट करत खळबळ माजवून दिली होती. यामध्ये काहींनी अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं, तर काहींनी तिच्यावर टीका केली होती. वनिता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.
वनिता खरात येत्या 2 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी प्राजक्ताने आपल्या या लाडक्या मैत्रिणीला खास गिफ्ट देत तिचा आनंद द्विगुणित केला आहे. प्राजक्ताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वनिता खरातसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे ती लग्नाच्या एक दिवस आधीच वनिताला सुंदर गिफ्ट देताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
प्राजक्ता माळीने वनिता खरातला तिच्या लग्नासाठी आपल्या ब्रँड दागिने भेट केले आहेत. प्राजक्ताने हा सेट वनिताला देत त्याची माहिती सांगितली आहे. प्राजक्ताने वनिताला सोनसळीचा सेट गिफ्ट म्हणून दिला आहे. वनिता हे दागिने पाहून प्रचंड खुश झालेली पाहायला मिळाली. तिला हे दागिने फारच आवडले आहेत. शिवाय वनिताने आपल्या लग्नात प्राजक्तराजचे दागिने घालावे अशी इच्छा प्राजक्ताने व्यक्त केली आहे.
अभिनेत्रीचे लग्नाआधीचे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडत आहेत. काल वनिताच्या हातावर मेहंदी सजली आहे. अभिनेत्री आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. वनिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये वनिताच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढण्यात आली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर 'सुमितवाणी' असा हॅश टॅग दिला आहे. कारण तिच्या होणाऱ्या पतीचं नाव सुमित लोंढे असं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtrachi Hasyajatra, Marathi actress, Marathi entertainment