
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता तिच्या लॉकजाउन लग्न या प्रोजेक्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाहा काय आहे प्राजक्ताचं लॉकडाउन लग्न.

प्राजक्ता गायकवाडने नुकतचं तिच्या सोशल मीडियावर एक पत्रिका शेअर केली आहे. तर ही एक लग्नपत्रिका आहे.

प्राजक्ता लवकरच लॉकडाउन लग्न या नव्या चित्रपटात दिसणार आहे. तर त्याविषयीच तिने माहिती दिली आहे.

अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

अनेक मालिकांमधून आपली ओळख निर्माण केल्यानंतर प्राजक्ता आता चित्रपटांकडे वळली आहे.

लॉकडाउन लग्न मध्ये प्राजक्ता मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर सागर पाठक , सुमित संघमित्रा यांनी ही कथा लिहीली आहे.

चित्रपटातील इतर कलाकारंची अद्याप घोषणा करण्यात आली नाही.

पुढच्या वर्षी २९ फेब्रुवारीला चित्रपट प्रेश्रकांच्या भेटीला येणार आहे.

लवकरच चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून, सोशल मीडियावर याची घोषणा करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.