• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: घागर घुमूदे घुमूदे! प्राजक्ता गायकवाडनं नृत्य करत केली गौराईंची पूजा

VIDEO: घागर घुमूदे घुमूदे! प्राजक्ता गायकवाडनं नृत्य करत केली गौराईंची पूजा

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या (Prajakta Gaikwad) घरीही गौरी गणपतीचं आगमन झालं आहे.

 • Share this:
  मुंबई 14 सप्टेंबर: सध्या घरोघरी गौरी गणपतीचं (Ganesh Chaturthi) आगमन झालं आहे. तर भक्तीभावाने पूजा केली जात आहे. गणपतीनंतर घरी आलेल्या गौरी आता गोड पाहूनचार घेत आहेत. सुंदर साड्या, दागिणे आणि रोजचे नवनवीन नैवद्य तसेच महिलांची सुंदर नृत्य आणि गाणी असा एकून माहोल सगळीकडे पाहायला मिळत आहे. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या (Prajakta Gaikwad) घरीही गौरी गणपतीचं आगमन झालं आहे. प्राजक्ताने आपल्या घरच्या गौराईंचं स्वागत करत त्यांना सुंदर असं सजवलं देखील आहे. प्राजक्ताच्या घरी दरवर्षी गौरी गणपती (Gauri Ganpati) येतात. तिने सुंदर नृत्य करत गौरींची पूजा केली आहे. घागर घुमूदे घुमूदे या सुंदर गाण्यावर ती नृत्य करताना दिसते. तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना देखील फारच आवडला आसून तिचं कौतुक केलं जात आहे.
  प्राजक्ताने आणखीही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती गौराईंना सजवताना दिसत आहे. तर तिनेही पारंपरिक वेष केला आहे ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. नेहमीच निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Prajakta Gaikwad dance video)
  सध्या प्राजक्ता कोणत्याही मालिकेत दिसत नाही. मागील वर्षी ती ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत दिसली होती. तर त्यानंतर ती कोणत्याही मालिकेत दिसली नाही. तर काही चित्रपटांत ती दिसणार आहे. लॉकडाउन लग्न या चित्रपटात ती दिसणार आहे. त्याचे काही फोटोही तिने शेअर केले होते.
  Published by:News Digital
  First published: