मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडनं सुरू केली वादनाची तयारी; ढोल वाजवतानाचा दमदार VIDEO व्हायरल

Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडनं सुरू केली वादनाची तयारी; ढोल वाजवतानाचा दमदार VIDEO व्हायरल

अभिनेत्रा प्राजक्ता गायकवाडनं तिच्या ढोल ताशा वाजवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून गणपती आगमनाची उत्सुकता तिनं दाखवली आहे. पाहा तिचा दमदार व्हिडीओ.

अभिनेत्रा प्राजक्ता गायकवाडनं तिच्या ढोल ताशा वाजवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून गणपती आगमनाची उत्सुकता तिनं दाखवली आहे. पाहा तिचा दमदार व्हिडीओ.

अभिनेत्रा प्राजक्ता गायकवाडनं तिच्या ढोल ताशा वाजवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून गणपती आगमनाची उत्सुकता तिनं दाखवली आहे. पाहा तिचा दमदार व्हिडीओ.

  मुंबई,1 ऑगस्ट : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. कधी कोणत्या सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावताना, तर कधी अनवाणी पायानं गडाची सैर करताना तर आनंदानं आषाढीच्या वारीत सहभागी होताना प्राजक्ता आपल्याला दिसत असते. मुळची पुण्याची असलेली प्राजक्ता अनेक गोष्टींमध्ये पारंगत आहे. मालिकेच्या निमित्तानं प्राजक्तानं भाला फेक, घोडेस्वारी, तलवार बाजी अशा अनेक नव्या गोष्टी शिकल्या. पुण्याची लेक आणि तिला ढोल ताशा वाजवता येत नाही असं होणार नाही. प्राजक्ता उत्तम वादक देखील आहे. पुण्याची असल्यानं पुण्यातील ढोल ताशा पथकात प्राजक्ता सहभागी होत असते. गणपती जवळ येत असताना प्राजक्तानं देखील वादनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड दरवर्षी पुण्याच्या ढोल ताशा पथकात सहभागी होत असते. ढोल ताशाच्या गजरात तल्लीन होऊन प्राजक्ता वाजन करताना दिसते. गणेशोत्सवाच्या मिरवणूकीचं प्रमुख आकर्षण असलेल्या ढोल ताशा पथकाच्या सरावांना आता सुरुवात झाली आहे. प्राजक्तानं देखील सरावाला सुरुवात केली असून गणपती आगमनाची उत्सुकता दाखवली आहे. हेही वाचा - Y The Film: 'वाय' सिनेमाचं महाराष्ट्राबाहेर स्पेशल स्क्रिनिंग; कलाकारांनीही लावली हजेरी
  प्राजक्तानं वादनाच्या सरावाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्यात ती ढोल वाजवताना दिसतेय. तिच्या भोवती अनेक वादक ताशा वाजवत असून प्राजक्ता मधोमध उभी राहून ढोल वाजवताना दिसतेय. व्हिडीओ शेअर करत प्राजक्तानं सुंदर पोस्टही शेअर केली आहे. तिनं म्हटलंय, 'खरंतर जिवापेक्षा जड...पण वाजवायला सुरुवात केली तर नादच. ढोल ताशा तयारी सुरू झाली . उत्सुकता आगमनाची. बाप्पामोरया'. प्राजक्ताला असं प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रीय असलेलं पाहून तिच्या चाहत्यांना नेहमीच तिचा हेवा वाटत असतो. तिच्या पोस्टवर कमेंट्स करत चाहते तिचं कौतुक करत असतात. तिला ढोल वाजवतानाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी म्हटलंय, 'ताई साहेब तुमची प्रशंसा करावी तेवढीच फार कमी'. तर दुसऱ्या एका चाहत्यानं म्हटलंय, 'एकदम कडक, लय भारी, ताई खूप सुंदर'. प्राजक्ताच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर प्राजक्ता स्वराज्य रक्षक संभाजी नंतर आईमाझी काळुबाई या मालिकेत दिसली होती. तिच्या या मालिकेमुळे कॉस्ट्रोवर्सी देखील झाली होती. त्यानंतर मात्र प्राजक्ता कोणत्याच मालिकेत किंवा सिनेमात दिसली नाही. प्राजक्ता सध्या अनेक कार्यक्रमात सहभागी होताना दिसते. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असून अनेक सुंदर फोटोशूट, रिल्स व्हिडीओ शेअर करताना दिसते.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या