Home /News /entertainment /

'आलिया करू शकते तर....' रानबाजारमध्ये स्वतःची मुलगी पाहून प्राजक्ताच्या आईला आठवली गंगूबाई

'आलिया करू शकते तर....' रानबाजारमध्ये स्वतःची मुलगी पाहून प्राजक्ताच्या आईला आठवली गंगूबाई

‘रानबाजार’च्या टीझरमध्ये प्राजक्ता माळी बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. तिचा बोल्ड अंदाज पाहून प्राजक्ताच्या आईने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali )   आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit)  यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रानबाजार ही वेबसीरिज 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीझरमध्ये प्राजक्ता माळी बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांनी मात्र तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. काहींनी प्राजक्ताचं वेगळी भूमिका निवडल्याने तिचं कौतुक देखील केलं. प्राजक्ताना नुकत्याच एका मुलाखतीत याबद्दल सांगितली आहे. तसेच या सगळ्यावर व तिच्या रानबाजारमधील भूमिकेवर आईची काय प्रतिक्रिया होती याबद्दल देखील तिनं या मुलाखतीत सांगितलं आहे. प्राजक्ता म्हणाली की, महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. कोणी मला मुलगी, बहीण, आयडॉल मानतंय त्यामुळे निश्चितच त्यांना हा टिझर मनाला लागला आहे. मी त्यांच्या भावना समजू शकते, मला त्याबद्दल आदर आहे. पण एक माणूस म्हणून मी एक वेगळी व्यक्ती आहे आणि मी एक कलाकार म्हणूनही वेगळी आहे. कलाकार म्हटलं की वेगवेगळ्या भूमिका करणं हे तुमचं काम आहे. त्यामुळे प्रेक्षक नाराज होणार याची मला जाणीव होती. कामाठीपुरामधील एका सेक्सवर्करची माझी भूमिका आहे. प्रदर्शित झालेला टीझर आणि सीरिज वेगवेगळा आहे. त्यामुळे तुम्ही आधी सीरिज पाहा मग सांगा, असं प्राजक्ता म्हणाली. वाचा-VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर प्राजक्ता पुढे म्हणाली की, या सीरिजचा पहिला एपिसोड वाचून झाल्यानंतर मी पाच मिनिटं टाळ्याच वाजवत होते. आणि, मला यामधील कोणतीही भूमिका द्या मी ही सीरिज करायला तयार आहे हे एक कलाकार म्हणून माझं ठरलं होतं. ही सीरिज पाहिल्यावर माझ्या आईनेही प्रतिक्रिया दिली. जेव्हा मला या वेबसिरीजबाबत कळले त्यावेळी मी स्क्रिप्ट वाचलं आणि ही भूमिका तगडी आहे याची जाणीव झाली. मात्र ही भूमिका स्विकारण्याच्या आधी मी आईची रीतसर परवानगी मागितली होती. भूमिका अशी अशी आहे असे मी तिला सांगितले होते. तेव्हा आई म्हणाली होती की, ‘आलिया भट्ट जर काठियावाडीमध्ये करू शकते तर तू का नाही. असं आईचं मनापासून उत्तर होतं. तिचा मला पूर्ण पाठिंबा आहे, असं या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली. वाचा-VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर मी कलाकार म्हणून ती भूमिका वठवली आहे आणि कलाकारांचं तेच काम असतं समाजात अस्तित्वात असणाऱ्या विविध भूमिका साकारणं. एका अभिनेत्रीच्या बाबतीत नाचणं, लाजनं, मुरडनं, हसणं यातच कितीतरी वर्षे निघून जातात. खूप कमी वेळा चांगल्या भूमिका तिच्या पदरात पडतात, की ज्याच्यात ती अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करू शकेल. प्रेक्षक असं म्हणतात की, मराठीतली ही सर्वात बेस्ट वेबसिरीज आहे, मी म्हणेन की हिंदुस्तानातली ही सर्वात बेस्ट सिरीज आहे. त्यामुळे या सिरीजमधल्या कुठल्याही भूमिकेत मला टाकलं असतं तरी मी ही सिरीज केली असती, असं देखील प्राजक्ता यावेळी म्हणाली.
  या सीरीजमध्ये सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजित पानसे सोबतच उर्मिला कोठारे आणि माधुरी पवार हे कलाकार दिसणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या