Home /News /entertainment /

'मिठीत तुझिया असताना... ' प्रिया बापटचा रोमँटिक अंदाज! नवऱ्याबरोबरचा फोटो VIRAL

'मिठीत तुझिया असताना... ' प्रिया बापटचा रोमँटिक अंदाज! नवऱ्याबरोबरचा फोटो VIRAL

प्रिया बापट (Priya Bapat Photo) आणि उमेश कामत हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतलं एक क्युट कपल आहे. नुकताच प्रियानं एक रोमँटिक फोटो शेअर केला. त्यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

  मुंबई, 19 डिसेंबर : बॉलिवूडमधल्या (Bollywood)  विरुष्का (Virushka), दीपवीर (Deepveer), सैफिना (Saifina) अशा ग्लॅमरस जोड्या कायम चर्चेत असतात. मात्र मराठीतल्या (Marathi film industry) जोड्याही रसिकांना भुरळ घालतात. प्रिया बापट आणि उमेश कामत ही त्यापैकीच एक जोडी. सोशल मिडीयावर या आपल्या आवडत्या जोडीला नित्यनेमानं फॉलो करत त्यांचे अपडेट्स ठेवणं हा त्यांच्या चाहत्यांचा प्रिय छंद असतो. आजच प्रिया बापटनं आपल्या इन्स्टा अकाउंटवरून पोस्ट केलेल्या रोमॅन्टिक फोटोतून पुन्हा एकदा याची प्रचिती आली. प्रियानं आपल्या अकाउंटवर उमेशला प्रेमानं मिठी मारतानाचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो पोस्ट केला आहे. तुला घट्ट मिठी मारल्यावर सगळं काही किती छान आहे असं वाटतं... अशी कॅप्शनही तिनं फोटोला दिली आहे. चार तासातच 70 हजारहून जास्त लोकांनी फोटोला लाईक केलं असून 204 जणांनी कमेंट्समध्ये जोडीचं भरभरून कौतुक केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

  प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही गुणी कलावंत आहेत. विविध मालिका, चित्रपटांसह त्यांनी नाटकांचा मंचही गाजवला आहे. दोघांनी एकत्र काम केलेली 'आणि काय हवं' ही वेब सिरीज प्रेक्षकांना आवडली होती. दोघांच्या वयात असलेलं 8 वर्षांचं अंतर त्यांनी आपल्या समंजस प्रेमातून जणू नाहीसं केलं. सहा वर्षं एकमेकांना डेट केल्यावर प्रियानं पुढाकार घेत उमेशला प्रपोज केलं. प्रियाच्या वाढदिवशी उमेशनं आपला होकार तिला कळवला आणि दोघेही 2011 साली विवाहबंधनात अडकले.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Instagram, Priya bapat, Relationship

  पुढील बातम्या