मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्राची देसाईला चित्रपट काम का मिळत नाही? सांगितलं बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव

प्राची देसाईला चित्रपट काम का मिळत नाही? सांगितलं बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव

घराणेशाहीच्या वादात प्राची देसाईची उडी; थक्क करणारा अनुभव सांगत केली बॉलिवूडची पोलखोल

घराणेशाहीच्या वादात प्राची देसाईची उडी; थक्क करणारा अनुभव सांगत केली बॉलिवूडची पोलखोल

घराणेशाहीच्या वादात प्राची देसाईची उडी; थक्क करणारा अनुभव सांगत केली बॉलिवूडची पोलखोल

मुंबई 23 मे: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला. या प्रकरणावर सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. (Bollywood nepotism) काहींनी स्टारकिड्सच्या बाजूनं तर काहींनी त्यांच्या विरोधात. आता या घराणेशाहीच्या वादात प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desais) हिनं देखील उडी मारली आहे. प्राची सध्या बेरोजगार आहे. तिच्याकडे सध्या कुठलाच चित्रपट नाही. अन् यासाठी तिनं बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे.

प्राचीनं नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखती दिली. या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य करत असतानाच घराणेशाहीवर देखील निशाणा साधला.

गोविंदाची भाची बिकीनी घालून करत होती स्टंट; गेला तोल अन् झाली ट्रोल

“घराणेशाही हे बॉलिवूडमधील एक कटू सत्य आहे. अन् तुम्ही ते कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी दररोज तुम्हाला त्याचा समाना करावा लागतो. खरा स्टार कोण हे प्रेक्षकच ठरवतात असं म्हटलं जातं. परंतु हे अर्धसत्य आहे. प्रेक्षकांसमोर कोण झळकणार हे मात्र बॉलिवूडमधील काही ठराविक गट ठरवतात. मला टीव्ही मालिकांमधून जे यश मिळालं तसं यश चित्रपटांमध्ये मिळालं नाही. यासाठी माझा अभिनय नव्हे तर घराणेशाही कारणीभूत आहे. अनेक चांगल्या भूमिका मला स्टारकिड्ससाठी सोडाव्या लागल्या. शिवाय ज्या चित्रपटांमध्ये काम मिळत होतं तिथं तडजोड करण्यास सांगितलं जात होतं. स्क्रिप्ट न वाचता चित्रपट स्विकारावा किंवा गरज नसताना इंटिमेट सीन्स करावे अशी मागणी केली जात होती. अन् अशा प्रकाराला नकार दिल्यामुळं सध्या मला चित्रपट मिळत नाहियेत.” असा अनुभव प्राचीनं या मुलाखतीत सांगितला.

प्राची देसाईनं 2006 पासून तिच्या करीअरला सुरुवात केली. तिनं 'कसम से' या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर 2008 मध्ये 'रॉक ऑन' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई,' 'बोल बच्चन', 'अजहर' आणि 'एक विलेन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

First published:

Tags: Bollywood actress, Marathi entertainment