Home /News /entertainment /

अधूरी एक कहानी... प्रभूदेवाशी लग्न करण्यासाठी अभिनेत्रीनं बदलला धर्म, पण तरीही झालं ब्रेकअप

अधूरी एक कहानी... प्रभूदेवाशी लग्न करण्यासाठी अभिनेत्रीनं बदलला धर्म, पण तरीही झालं ब्रेकअप

प्रभूदेवाची ही लव्हस्टोरी राहीली होती अपूरी. पहा कोण होती प्रसिद्ध अभिनेत्री.

  मुंबई 13 जून: सिनेसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची प्रेमकहानी ही अधुरीच राहीली. त्यात अनेक स्टार्सची नावं ही आहेत. साउथ तसेच बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता, डान्सर, दिग्दर्शक प्रभू देवा (Prabhu Deva) आणि प्रसिद्ध अभिनेत्रीची अशीच काही कहानी आहे. साउथची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayantara) आणि प्रभूदेवा यांच प्रेमप्रकरण विशेष रंगलं होतं. पण ही कहानी अर्ध्यावरचं थांबली होती. नयनतारा आणि प्रभूदेवा 2008 साली एकमेकांना भेटले होते. नयनताराचं प्रभूदेवावर जीवापाड  प्रेम होतं. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. पण प्रभूदेवा मात्र आधीच विवाहीत होता. तर त्याला दोन मुलं देखील होती. तरीही प्रभूदेवा आणि नयनतारा यांचं प्रेमप्रकरण सुरूचं होतं.
  नयनताराचं खरं नाव डायना मरियन कुरियन (Dayna Mariam Kurian) असं होतं. तिचा जन्म एका कट्टर ख्रिस्ती कुटुंबात झाला होता. पण प्रभूदेवाशी लग्न करण्याची ती स्वप्न पाहत होती. आणि त्यासाठी तिने धर्मपरिवर्तन करण्याचं ठरवलं. चेन्नईतील एका मंदीरात शुद्धी क्रिया करून तिने सनातन हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. तेव्हा तिने नावही बदललं व नयनतारा हे नाव तिने स्वीकारलं. तर तेच नाव आता तिचं अधिकृत नाव बनलं आहे.

  सूर नवा ध्यास नवा 2021: कोण ठरणार नव्या पर्वाची महागायिका?

  नयनतारा आणि प्रभूदेवाचं अफेअर आता त्याची पत्नी लता हीला देखील समजलं होतं. तेव्हा तिने प्रभूदेवाला धमक्या द्यायला सुरुवात केली. व जर प्रभूदेवाने नयनताराशी लग्न केलं तर मी उपोषण करेन असा इशाराचं तिने दिला होता.  तिने नयनतारा विरोधात फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली. तसेच काही महिला संघटनांशीही तिने संपर्क साधून नयनतारा विरोधात आंदोलंनही केलं होतं. त्यामुळे तिची बदनामी झाली होती. 2011 मध्ये प्रभूदेवा आणि लता यांनी घटस्फोट घेतला. प्रभूदेवा आणि नयनतारा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र 2012 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. नयानताराने स्वतः ही रिलेशनशीप संपली असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे प्रभूदेवा आणि नयनताराचं कधीही लग्न होऊ शकलं नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Love story

  पुढील बातम्या