09 मे : 'बाहुबली 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केलीय. त्यामुळे भावुक झालेल्या प्रभासनं आपल्या फॅन आणि सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केलीय.
तो लिहितो, ' आपण व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांना अलिंगन देतो. बाहुबलीचा प्रवास खूप मोठा आहे. पण यात मी जे काही मिळवलं ते तुम्हा सर्वांचं प्रेम अाहे. त्यासाठी मला खूप मेहनतही घ्यावी लागली. मला देशातल्या अनेक भागांमधून आणि देशाबाहेरूनही भरपूर प्रेम मिळतंय. मी खरोखर भारावून गेलोय.'
एवढी मोठी भूमिका दिल्याबद्दल त्यानं दिग्दर्शकाचेही आभार मानलेत. ' माझ्यावर तुम्ही विश्वास टाकलात आणि बाहुबलीसारखी व्यक्तिरेखा देऊन माझा पुढचा प्रवास एकदम स्पेशल केलात, त्याबद्दल धन्यवाद. '
37 वर्षांचा प्रभास सध्या अमेरिकेत सुट्टी एंजाॅय करतोय.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.