मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'राधेश्याम' चित्रपटातील एकट्या प्रभासच्या कॉस्ट्यूमसाठी तब्बल इतका कोटी खर्च!

'राधेश्याम' चित्रपटातील एकट्या प्रभासच्या कॉस्ट्यूमसाठी तब्बल इतका कोटी खर्च!

Radhyeshyam

Radhyeshyam

राधेशाम चित्रपटासाठी 1970 च्या दशकातील व्हिंटेज कपडे एवढ्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने प्रभास खास डिझाइन केलेले एथनिक कपडे घालणार आहे.

मुंबई, 18 फेब्रुवारी: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी बिग बजेट चित्रपट 'राधेश्याम'ची (Radhe Shyam) घोषणा झाल्यापासून त्याचे चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुभाषिक चित्रपटामध्ये प्रभासचा रोमँटिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरमधील प्रभासच्या लव्हर बॉय लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसंच या चित्रपटात प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडेने (Pooja Hegde) घातलेल्या कपड्यांची देखील चर्चा होत आहे.

या दोन्ही कलकारांमधील रोमान्स त्यांच्या क्लासिक वेशभूषेतून वाढत जाईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटातील एकट्या प्रभासच्या वेशभूषेसाठी तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Gulte.com ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी या चित्रपटासाठी पाण्यासारखा पैसा ओतलाय मग प्रभासच्या वेशभूषेला 6 कोटी रुपये खर्च का होईना. मागच्या वर्षी या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आला होता. यामध्ये प्रभास नयनरम्य युरोपमध्ये खूपच स्टाइलिश लूकमध्ये दिसला. प्रभासने याआधीच्या 'साहो', 'बाहुबली' आणि इतर चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन हिरोची भूमिका साकारली होती. पण 'राधेश्याम' चित्रपटात तो रोमँटिक भूमिका साकारताना दिसणार आहे.

या रिपोर्टमध्ये पुढे असंही म्हटलं आहे की, 1970 च्या दशकातील व्हिंटेज कपडे एवढ्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने या चित्रपटात प्रभास खास डिझाइन केलेले एथनिक कपडे घालणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभासचे कपडे तयार करण्यासाठी खास डिझायनर्स देखील ठेवले आहेत. प्रभासचा 'राधेश्याम' चित्रपट हा सगळ्यात महागडा प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती यूव्ही क्रिएशन्स, गोपी कृष्णा पिक्चर्स आणि टी-सीरिज यांनी केली आहे.

हे देखील वाचा - सुशांतच्या आत्महत्येमुळं संदीप होता अस्वस्थ; सुचितानं केला खळबळजनक खुलासा

राधा कृष्ण कुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून त्यांनीच या चित्रपटाचं लेखन केलं आहे. जस्टीन प्रभाकर यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहेत. ‘राधेश्याम’ हा एक बहुभाषिक चित्रपट असणार आहे जो हिंदी, तेलुगू, इंग्लिश अशा वेगवेगळ्या 6 भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान, व्हेलेंटाइन डेच्या (valentine day) निमित्ताने प्रभासने या चित्रपटातील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये युरोपीयन रेल्वे स्टेशनवर तो पूजा हेगडेला इटालियन भाषेत संदेश देताना दिसला. या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Prabhas, Romance, Upcoming movie