02 जानेवारी : 'बाहुबली' नंतर आता प्रभास लवकरच बॉलिवूडमधून आपल्या भेटीला येणार आहे. तो बॉलिवूडच्या एका चित्रपटातून आपलं डेब्यू करणार आहे ,ज्याची ३ वर्षांपासून तयारी सुरु आहे.
सध्या प्रभास आपली अपकमिंग फिल्म 'साहो' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. प्रभास एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हणाला की 'तीन वर्षांपूर्वीच मी या चित्रपटासाठी होकार दिला आहे. 'साहो' ची शूटिंग संपताच या चित्रपटावर काम सुरु करणार आहे. '
बाहुबली' नंतर प्रभासची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. प्रभास यापूर्वीच म्हणाला होता की, 'मी हिंदी चित्रपट खूप प्रमाणात पाहतो. मी जेथे राहतो त्या हैद्राबादमध्ये ६०% टक्के लोक हिंदी बोलतात.मला बॉलीवूड मधून चांगली ऑफर मिळाली आहे. हा सिनेमा एक लव्हस्टोरी असेल जी मी 'साहो' नंतर करणार असल्याची माहिती प्रभासने दिली.
बॉलीवूड मधील एन्ट्रीची बातमी हि प्रभासच्या फॅन्ससाठी आनंदाची असेल हे मात्र नक्की
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.