मुंबई, 1 मार्च- 'बाहुबली' (Bahubali) फेम साऊथ सुपरस्टार प्रभास (Actor Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या रिलीज डेटची आतुरतेने वाट पाहत होते. आणि आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आदिपुरुषची रिलीज डेट निर्मात्यांनी जाहीर केली आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिपुरुषची रिलीज डेट (Release Date) जाहीर केली आहे.तर अभिनेता प्रभासनेसुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.
बिग बजेट असलेल्या आदिपुरुषकडून चाहत्यांना खूप आशा आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात सुरुवातीपासूनच उत्सुकता आहे. अलीकडेच क्रिती सेननने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते की, महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आदिपुरुषाबाबत मोठी घोषणा होणार आहे. क्रिती सेननने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये चित्रपटाचा लोगो दिसत आहे.
या पोस्टरसोबत अभिनेत्रीने 'घोषणा' असे लिहिले होते. हे पोस्टर पाहून चाहत्यांचा उत्साह वाढला होता. आणि आता महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी बहुप्रतिक्षित आदिपुरुषची रिलीज डेट जाहीर केली आहे. प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.रिलीजची डेट थोडी दूर असल्याने आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे चाहते थोडे निराश झाले आहेत.
आदिपुरुष टी-सिरीजची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार , ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर यांनी केली आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास प्रभू श्रीराम आणि क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खानने 'आदिपुरुष' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.
(हे वाचा:लेक सुहानाला साडीत पाहून आई गौरीलाही भावना झाल्या अनावर, म्हणाली...)
प्रभास सध्या दोन बिग बजेट चित्रपटांमधून समोर येणार आहे. त्यामुळे फारच उत्सुक आहेत. 'आदिपुरुष' सोबतच प्रभास 'राधे श्याम' या बहुचर्चित चित्रपटातसुद्धा झळकणार आहे. या चित्रपटाचीसुद्धा जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची फक्त देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा धूम आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच तिकिटांची 90 टक्के विक्री झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kriti sanon, Movie release, Prabhas, Saif Ali Khan, South indian actor, Upcoming movie