फक्त 8 मिनिटांच्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रभासवर खर्च केले तब्बल एवढे कोटी रुपये!

साहो सिनेमातील अ‍ॅक्शन सीनचं दिग्दर्शन केनी बेट्सने केलं आहे. विशेष म्हणजे सिनेमातील 90 टक्के सीन हे खरे आहेत. सिनेमात श्रद्धा कपूरने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 05:53 PM IST

फक्त 8 मिनिटांच्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रभासवर खर्च केले तब्बल एवढे कोटी रुपये!

प्रभास हे नाव वाचल्यावर लार्जर दॅन लाइफ इमेज सर्वांसमोर येते. सध्या प्रभास त्याच्या आगामी साहे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बाहुबलीनंतर प्रभासचा हा पहिला सिनेमा असल्यामुळे प्रेक्षक आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत आहेत.

या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा म्हणून साहोकडे पाहिलं जात आहे. प्रभासच्या या सिनेमासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, साहो सिनेमातील आठ मिनिटांच्या एका अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी निर्मात्यांनी तब्बल 70 कोटी रुपये खर्च केले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, साहोचे सिनेमॅटोग्राफर Madhie ने सांगितलं की, आठ मिनिटांच्या एका अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सिनेमॅटोग्राफीनुसार सिनेमाची काही दृश्य पाहिल्यानंतर असं नक्कीच म्हणता येईल की हा सिनेमा इतिहास रचेल. फक्त एका सीक्वेन्ससाठी निर्माते एवढा खर्च करणं ही दुर्मिळ गोष्ट आहे.

सिनेमॅटोग्राफीनुसार सिनेमाची काही दृश्य पाहिल्यानंतर असं नक्कीच म्हणता येईल की हा सिनेमा इतिहास रचेल. फक्त एका सीक्वेन्ससाठी निर्माते एवढा खर्च करणं ही दुर्मिळ गोष्ट आहे.

साहो सिनेमातील अ‍ॅक्शन सीनचं दिग्दर्शन केनी बेट्सने केलं आहे. विशेष म्हणजे सिनेमातील 90 टक्के सीन हे खरे आहेत. सिनेमात श्रद्धा कपूरने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

साहो सिनेमातील अ‍ॅक्शन सीनचं दिग्दर्शन केनी बेट्सने केलं आहे. विशेष म्हणजे सिनेमातील 90 टक्के सीन हे खरे आहेत. सिनेमात श्रद्धा कपूरने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

Loading...

एका सिनेमाला यशस्वी करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व गोष्टी साहो सिनेमात ठासून भरल्याचं टीमचं म्हणणं आहे. सिनेमात प्रभास आणि श्रद्धाशिवाय नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे अशा स्टार बॉलिवूडकरांचा समावेश आहे.

येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. तमिळ तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बाटला हाउस हे दोन सिनेमेही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक नक्की कोणता सिनेमा पाहतील आणि कोणता सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...