Home /News /entertainment /

बाहुबली प्रभासला ‘Lockdown’ चा फटका; कंपनीवर 1000 कोटीचं कर्ज

बाहुबली प्रभासला ‘Lockdown’ चा फटका; कंपनीवर 1000 कोटीचं कर्ज

एकीकडे बाहुबली प्रभास कर्जात अडकला असताना त्याच्या आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा टीझर रिलीज झाला आहे. मोठ्या नुकसानानंतर त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

  मुंबई, 16 फेब्रुवारी: कोरोनाच्या काळात संपूर्ण देश जवळपास तीन महिने बंद होता. अनेक उद्योग धंदे ठप्प झाले होते. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचं खूप नुकसान झालं. काही लोकांच्या कंपनी कायमच्या बंद पडल्या, तर काहींच्या उद्योगांचे कंबरडेच मोडले. बाहुबली फेम ‘प्रभास’लादेखील या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्याच्या प्रोडक्शन हाउसला जवळपास हजार कोटींचा तोटा झाल्याचं समजत आहे. 2013 मध्ये यूव्ही क्रिएशन्स या नावाने हे प्रोडक्शन हाउस सुरू करण्यात आलं होत. बाहुबली, साहो, मिर्ची अशा अनेक चित्रपटांची निर्मिती या प्रोडक्शन हाउसद्वारे करण्यात आली आहे. आता प्रभासचा आगामी चित्रपट ‘राध्येश्याम’ हीच कंपनी घेऊन येत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून प्रभास सोबत मुख्य भूमिकेत पूजा हेगडे दिसत आहे. या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे. टीझरमध्ये एका युरोप मधल्या रेल्वे स्थानकावरचं दृश्य दिसत आहे. (हे देखील वाचाकंगना झाली होती किडनॅप; अभिनेत्रीच्या आत्मनिर्भर स्ट्रगलची उडवली जातेय खिल्ली)   टीझरमध्ये पूजा प्रभासला ‘स्वतःला मोठा रोमियो समजतोस का?’ असं विचारतेय. त्यावर प्रभास तिला, ‘नाही, त्याने प्रेमासाठी जीव दिला होता मी त्या टाईपचा नाही’, असं उत्तर देतो. हा चित्रपट आता 30 जुलै रोजी रिलीज होणार आहे. कंपनीच झालेलं नुकसान पाहता प्रभासला या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत.

  (हे देखील वाचा -     काय होती संदीपची शेवटची इच्छा?; अभिनेत्यानं का घेतला आत्महत्येचा निर्णय)

  याचसोबत प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ मधून भगवान श्री रामांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत अजय देवगण, सैफ अली खान हे सुद्धा आपल्याला दिसून येतील.
  Published by:news18 desk
  First published:

  Tags: Actor, Bollywood, Bollywood News, Lockdown, Money, Pay the loan, Prabhas, Star celebraties

  पुढील बातम्या