प्रदर्शनाआधीच Saaho नं उडवली प्रभासची झोप, वाचा काय आहे नेमकं कारण

प्रदर्शनाआधीच Saaho नं उडवली प्रभासची झोप, वाचा काय आहे नेमकं कारण

Saaho साठी प्रभासनं खूप मेहनत घेतली असली तरीही सध्या या सिनेमानं प्रभासची झोप उडवली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : 'बाहुबली : द बिगनिंग' (Baahubali: The Beginning) आणि 'बाहुबली: द कनक्लूजन' (Baahubali 2: The Conclusion) असे एका मागोमाग एक हीट सिनेमा दिल्यानंतर अभिनेता फक्त भारतातच नाही तर विदेशातही लोकप्रिय ठरला. आता जगभरात त्याचे चाहते आहेत. राजामौलींच्या या सिनेमासाठी प्रभासनं पूर्ण 5 वर्षांचा वेळ दिला होता. हा सेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्याकडे अनेक निर्मात्यांच्या रांगा लागल्या होत्या. पण प्रभासनं मात्र ‘बाहुबली 2’ नंतर ‘साहो’ हा बिग बजेट सिनेमा साइन केला. या सिनेमासाठी प्रभासनं खूप मेहनत घेतली असली तरीही सध्या या सिनेमानं प्रभासची झोप उडवली आहे. या सिनेमामुळे सध्या प्रभास काहीसा घाबरलेल्या अवस्थेत आहे.

नुकताच PTI ला दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द प्रभासनंच या गोष्टीचा खुलासा केला आहे. प्रभास सांगतो, ‘एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ कदीच विसरता येणार नाही.’ प्रभासचा बहुचर्चित सिनेमा साहो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा बद्दल बोलाताना प्रभास म्हणतो, ‘साहो माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या खूपच स्ट्रेसफुल होता. हा तणाव या सिनेमाच्या स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकामुळे नाही. राजामौलींनी दिलेल्या तणावामुळे हा सिनेमा माझ्यासाठी मानसिक पातळीवर तणावपूर्ण होता.’

वाचा :ज्या हीरोबरोबर लहानपणी फोटो काढून घेतला, त्याचीच नायिका होणार ही मराठमोळी मुलगी

प्रभास पुढे म्हणाला, ‘आता मला प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचं एवढं प्रेम मिळत आहे की मला माहीत सुद्धा नव्हतं की लोक मला सर्वाधिक पसंत करतात. माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की, कशाप्रकारे गुजरातमध्येही लहान मुलं ‘बाहुबली’ची गाणी गाताना दिसतात. त्यामुळे या प्रेमाचा आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचा ताण खूप जास्त आहे आणि हे खूप भीतीदायक आहे. ‘साहो’मुळे अनेक रात्री न झोपता काढल्या आहेत. मी अनेक दिवस झोपलो नव्हतो कारण मी तणावात होतो.’

वाचा : ब्रेकअपनंतर स्वरा भास्कर पडली 'या' महान अभिनेत्याच्या मुलाच्या प्रेमात

प्रभास सध्या ‘बाहुबली’मुळे मिळालेला स्टारडम एंजॉय करत आहे. तो सांगतो, ‘हे सर्व कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. देशातल्या प्रत्येक शहरात आणि जगभरात लोक मला ओळखतात. हा मला आता पहिल्यासारखं कुठेही मुक्तपणे फिरण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. मात्र हे सर्व खूप छान वाटतं. मागच्या 6 वर्षांत सिनेमा साइन करण्यात मी खूपच स्लो झालो आहे. मात्र आता मला खूप फास्ट काम करायचं आहे.’ प्रभासनं ‘बाहुबली’साठी 5 तर ‘साहो’साठी 2 वर्ष दिली आहेत. प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘साहो’ येत्या 30 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

वाचा : आमिर खानच्या मुलीने शेअर केला हा फोटो, कॅप्शनमुळे सुरू झाली वेगळीच चर्चा

====================================================================

खासदार सुप्रिया सुळेंचा आजपासून संवाद दौरा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 08:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading