'बाहुबली' प्रभासने बदलला लूक

'बाहुबली' प्रभासने बदलला लूक

प्रभास नुकताच अमेरिकेहुन परतलाय. पण यावेळी प्रभास भारतात परतलाय एका नव्या रुपात नव्या ढंगात...

  • Share this:

05 जून : बाहुबली आणि बाहुबली 2 मधून लोकांची मन जिंकणाऱ्या  प्रभास नुकताच अमेरिकेहुन परतलाय. पण यावेळी प्रभास भारतात परतलाय  एका नव्या रुपात नव्या ढंगात...

बाहुबलीमध्ये एक योध्दा चित्तारणाऱ्या प्रभासने त्याचे वजन तर कमी केलंय पण त्यासोबत स्वत:ची हेअर स्टाईल ही बदलली आहे.

त्याच्या या नव्या रुपाचा शिल्पकार आहे प्रसिद्ध  स्टायलिस्ट -हाकीम अलीम.

हाकीमनेच त्याच्या नव्या अवताराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. प्रभास येत्या जुलै महिन्यात त्याच्या 'साहो' या नव्या चित्रपटाचे शुटिंग सुरू करतोय.

हा चित्रपट त्याने बाहुबलीनंतर केलेला पहिला चित्रपट आहे. बाहुबली करत असताना प्रभासने दुसरा कुठला सिनेमाच काय पण साधी जाहिरात ही केलेली नाही. आता मात्र प्रभासकडे ढीगभर सिनेमे आहेत. लवकरच प्रभास बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली आणि करण जौहर सोबत एक नवा चित्रपट करू शकतो.

First published: June 5, 2017, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading