मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'प्रभास'च्या आणखी एका मोठ्या सिनेमाची घोषणा, 'तान्हाजी' फेम ओम राऊतचं असणार दिग्दर्शन

'प्रभास'च्या आणखी एका मोठ्या सिनेमाची घोषणा, 'तान्हाजी' फेम ओम राऊतचं असणार दिग्दर्शन

सुपरस्टार प्रभासने (Prabhas) इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या प्रोजेक्टबाबत हिंट दिल्यानंतर त्याच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला होता. दिग्दर्शक ओम राऊत आणि प्रभास ही जोडी एकत्र दिसणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 18 ऑगस्ट : सुपरस्टार प्रभासने (Prabhas) इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या प्रोजेक्टबाबत हिंट दिल्यानंतर त्याच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला होता. 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' (Tanhaji: The Unsung Warrior) या बिग बजेट आणि बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करणाऱ्या सिनेमाच्या दिग्दर्शकाबरोबर प्रभासचा हा नवा प्रोजेक्ट असणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) आणि प्रभास ही जोडी एकत्र दिसणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

प्रभासने या प्रोजेक्टबाबत इन्स्टाग्रामवर संकेत दिल्यानंतर काही तासातच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. साहो स्टार दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदीपुरुष' (Adipurush) या अॅक्शन सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 'Prabhas 22' असणार आहे. 'Celebrating the victory of good over evil' अशी या सिनमाची टॅगलाइन असणार आहे.

या सिनेमाबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती उघड करण्यात आली नसली, तरी प्रभास भगवान रामांची भूमिका या सिनेमामध्ये साकारणार असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमाची टॅगलाइन देखील असेच संकेत देते. रामायणामध्ये देखील वाईटावर चांगल्याचा झालेला विजय असल्याने ही टॅगलाइन देखील समर्पक आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये देखील हाती धनुष्यबाण घेतलेली एक प्रतिमा दिसत आहे आणि बजरंगबली देखील या पोस्टरमध्ये दिसत आहेत.

अशी पोस्ट करून प्रभासने दिले होते सिनेमाचे संकेत-

दरम्यान हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, मलयाळम, कानडी आणि काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षीपासून सिनेमाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनाची तारीख 2022 मध्ये जाऊ शकते.

First published:

Tags: Prabhas, Saho prabhas