मुंबई, 21 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत. अनेक लोकप्रिय कलाकारांचं निधन होत आहे. अशातच मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉलिवूड अभिनेता जेसन डेव्हिड फ्रँक याचे निधन झालं आहे. पॉवर रेंजर फेम जेसन डेव्हिड फ्रँकने वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समोर येताच पॉवर रेंजरचे फॅन असलेल्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याचे जाण्याने मनोरंजन विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेत्याच्या जाण्याने जवळचे मित्र, कुटुंब, चाहते यांच्यावर शोककळा पसरली आहे.
फ्रँक्स ऑन द पॉवर रेंजर्सचा कलाकार वॉल्टर ई. जोन्सनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन जेसन डेविड फ्रँकला श्रद्धांजली वाहिली. त्याच्या जाण्याने सगळेजण दुःख व्यक्त करत आहेत. अनेक कलाकार पोस्ट शेअर करत जेसन डेव्हिड फ्रँकला श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त करत आहेत. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
View this post on Instagram
फ्रॅंकने पॉवर रेंजरच्या पहिल्या सीझनमध्ये टॉमी ऑलिव्हरची भूमिका साकारली होती. 28 ऑगस्ट 1993 ते 27 नोव्हेंबर 1995 पर्यंत चाललेल्या शोच्या पहिल्या सीझनमध्ये फ्रँकने टॉमी ऑलिव्हरची भूमिका साकारली होती. ग्रीन रेंजर म्हणून त्याची भूमिका चौदा भागांनंतर संपली. परंतु त्याच्या चाहत्यांच्या लोकप्रियतेमुळे, त्याला व्हाइट रेंजर आणि उर्वरित मालिकेसाठी कमांडर म्हणून ऑफर मिळाली.
दरम्यान, रेड झिओ रेंजर, रेड टर्बो रेंजर आणि ब्लॅक डिनो रेंजर, मायटी मॉर्फिन पॉवर रेंजर्स: द मूव्ही आणि टर्बो: ए पॉवर रेंजर्स मूव्ही या चित्रपटांमध्ये देखील फ्रॅंकने भूमिका साकारली आहे. फ्रँक 2009 आणि 2010 मध्ये अनेक मिश्र मार्शल आर्ट बाउटमध्ये लढला. तेव्हापासून त्याला मिक्स मार्शल आर्टिस्ट म्हणूनही ओळखलं जायचं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hollywood