मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vikram Gokhale यांचा शेवटचा सिनेमा; बॅरिस्टर अन् नटसम्राटप्रमाणे ही भूमिका देखील गाजवणार

Vikram Gokhale यांचा शेवटचा सिनेमा; बॅरिस्टर अन् नटसम्राटप्रमाणे ही भूमिका देखील गाजवणार

विक्रम गोखले

विक्रम गोखले

विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालं आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'सूर लागू दे' लवकरच थिएटरमध्ये धडकणार.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 29 नोव्हेंबर : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं नुकतंच निधन झालं. 26 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते जीवन मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि विक्रम गोखले आपल्याला सोडून गेले. त्यांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. विक्रम गोखले यांचं कुटुंब, मित्र-परिवार, चाहते यांना मोठा धक्काच बसलाय. अशातच विक्रम गोखलेंच्या चाहत्यांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालं आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'सूर लागू दे' लवकरच थिएटरमध्ये धडकणार आहे. 'सूर लागू दे' या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. त्यानुसार या चित्रपटाचं कथानकही काहीशा वेगळ्या पठडीतील आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार 'सूर लागू दे'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असलेला पहायला मिळत आहे.

निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी या चित्रपटाच्या वितरणाचं काम पाहत आहेत. राजश्री मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. पोस्टर शेअर करत लिहिलं, 'मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपणारा,आणि अबोल नात्यांना बोलतं करणारा 'सूर लागू दे' या सिनेमाचं पहिलं पोस्टर सिनेमाचे मुख्य कलाकार दिवंगत विक्रमजी गोखले यांना समर्पित'.

दरम्यान, विक्रम गोखले पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या पोटात पाणी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news