मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर लीक, पाहा अभिनेत्याचा जबरदस्त लूक

रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर लीक, पाहा अभिनेत्याचा जबरदस्त लूक

रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look viral))आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अशातच या चित्रपटाचा पोस्ट लीक झाला आहे.

रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look viral))आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अशातच या चित्रपटाचा पोस्ट लीक झाला आहे.

रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look viral))आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अशातच या चित्रपटाचा पोस्ट लीक झाला आहे.

  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 18 जून : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor)आणि अभिनेत्री आलिया भट्टचा (alia bhatt) आगामी चित्रपट ब्रम्हास्त्रचा (Bramahstra)नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रदर्शित होताच मोठा धमाका केलेला पहायला मिळाला. ट्रेलर प्रदर्शित होताच काही क्षणात व्हिडीओला लाखोंवर व्ह्यूज आले आणि अनेक प्रतिक्रियाही समोर आल्या. तेव्हापासून रणबीर (Ranbir latest movie) चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच रणबीरविषयी आणखी एक बातमी समोर आली आहे. रणबीरच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर लीक (Ranbir Upcomin movie poster leaked)झाला आहे.

रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look viral) आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अशातच या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर मोठा गौप्यस्फोट पहायला मिळत आहे. शमशेरा चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक व्हायरल झाला आहे. ट्विटरवर रणबीरच्या कॅरेक्टरचे पोस्टर कोणीतरी लीक केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. व्हायरल झालेल्या या लूकमध्ये रणबीर अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. # शमशेरा ट्विटरवर बिनधास्तपणे ट्रेंड करत आहे. या हॅशटॅगसह यूजर्स सतत रणबीर कपूरचे पोस्टर शेअर करत आहेत. पोस्टरमध्ये रणबीर कपूर कधीही न पाहिलेल्या अवतार दिसत आहे.

रणबीरच्या व्हायरल होत असलेल्या लूकमध्ये रणबीर लांब केसांमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातात एक हत्यार पहायला मिळत आहे. रणबीरचा लूक लीक झाल्यानं त्याचे चाहते सध्या खूप उत्साही असलेले पहायला मिळत आहे. चित्रपटाची उत्कंठा आणखीच वाढली असून चाहते आता चित्रपटासाठी प्रतीक्षा करू शकत नाहीत. कधी चित्रपट पहायला मिळेल अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शमशेरामध्ये रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त दिसणार आहेत. रणबीर कपूरचा चित्रपट शमशेरा 22 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रणबीरच्या नव्या लूकचं चाहत्यांकडून कौतुक होत असलं तरी काहीजण त्याला ट्रोलही करत आहेत. अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर रणबीर कपूरच्या लूकची तुलना हॉलिवूडचा हिट चित्रपट 'थोर: लव्ह अँड थंडर'च्या पोस्टरशी केली जात आहे. अद्याप यावर चित्रपटाच्या टीमकडून अधिकृत अशी काही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor, Upcoming movie