'पोश्टर बॉईज' आता हिंदीमध्ये

'पोश्टर बॉईज' आता हिंदीमध्ये

हा चित्रपट तीन हमालांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला आहे. हा सिनेमा पुरूष नसबंदीसारख्या संवेदनशील विषयावरचा एक कॉमेडी चित्रपट आहे

  • Share this:

24 जुलै: 2014 साली महाराष्ट्रात गाजलेला 'पोश्टर बॉईज' हा सिनेमा लवकरच हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये सनी देवल ,बॉबी देवल आणि श्रेयस तळपदे कॉमेडी लुकमध्ये दिसत आहेत.

हा चित्रपट तीन हमालांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला आहे. हा सिनेमा पुरूष नसबंदीसारख्या संवेदनशील विषयावरचा एक कॉमेडी चित्रपट आहे. श्रेयस तळपदे या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पोश्टर बॉइज हा मराठी सिनेमा 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता ज्यात दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत होते.

या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर मराठीतल्या पोश्टर बॉईजची आठवण येते. सनी देवल, बॉबी देवल आणि श्रेयस तळपदेसोबत लारा दत्ता, सोनाली कुलकर्णी आणि उर्वशी रौटेलादेखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तसंच भारती आचरेकरही या सिनेमात दिसणार आहे.

हा धमाल विनोदी सिनेमा 8 सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

First Published: Jul 24, 2017 08:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading