S M L

पाॅर्न इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अफगाणिस्तानच्या मुलीनं सोडला धर्म

अफगाणिस्तानचं मूळ असलेली यास्मिन अलीनं आपली दास्तान सांगितलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2018 05:54 PM IST

पाॅर्न इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अफगाणिस्तानच्या मुलीनं सोडला धर्म

मुंबई, 11 आॅगस्ट : हल्ली पाॅर्न इंडस्ट्रीला वेगळी प्रतिष्ठा मिळालीय. पाॅर्न आर्टिस्ट सनी लिओननं तर आता पाॅर्न इंडस्ट्री सोडून बाॅलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट केलंय. पण एका पाॅर्न आर्टिस्टनं या इंडस्ट्रीत येण्यासाठी तर आपला धर्मच बदलला. अफगाणिस्तानचं मूळ असलेली यास्मिन अलीनं आपली दास्तान सांगितलीय.

spectator.usच्या बातमीनुसार यास्मिन युद्धग्रस्त अफगाणिस्तानात जन्मली. ती 9 वर्षांची असतानाच तिचे आईवडील ब्रिटनला स्थायिक झाले. यास्मिन तिथंच लहानाची मोठी झाली. घरात पारंपरिक वातावरण होतं. त्याविरोधात तिनं बंड पुकारलं होतं.

यास्मिन म्हणते, ' इस्लाममध्ये बरेच प्रतिबंध आहेत. ड्रेस कोड आहे. तो पाळला नाही तर महिलांना दंड होतो. जबरदस्तीनं तुमचं लग्न लावलं जातं. अनेकदा तुमचे आईवडीलही मजबूर होतात.'अलीचं बालपण अफगाणिस्तानात गेलं. तर पुढचं आयुष्य ब्रिटनमध्ये. अली सांगते, ' लहानपणी माझ्या आईवडिलांनी सांगितलं की इस्लाम किती महत्त्वाचा आहे तो. ते माझ्यापेक्षा धर्मावर प्रेम करायचे. मी एकदम भयग्रस्त वातावरणात लहानाची मोठी झाले. जे काही आधुनिक होतं, त्याचा माझे आईवडील तिरस्कार करायचे.'

ब्रिटनमध्ये यास्मिन अलीचं पाॅर्न इंडस्ट्रीत मोठं नाव आहे. त्यासाठी तिला बऱ्याच कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. तिनं धर्मही सोडला. शेवटी काम, करियर आणि माणूस असणं हे कुठल्याही धर्मापेक्षा वरचढ आहे.

सनी लिओनच्या आयुष्यावरही वेबसीरिज आलीय. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेशकरण्या आधी सनी जर्मन बेकरीमध्ये काम करायची. तसंच तिने टॅक्स अँड रिटायरमेंट फर्ममध्ये देखील काम केलं आहे. खरंतर तिला नर्स बनायचं होतं. म्हणून पिडिऑट्रिकचं शिक्षण देखील घेतलं. पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी सनी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 05:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close