'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला लागलं होतं पॉर्न पाहण्याचं व्यसन

'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला लागलं होतं पॉर्न पाहण्याचं व्यसन

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, पॉर्न पाहण्याचं व्यसन तुमच्या मेंदूवर थेट परिणाम करतं

  • Share this:

मुंबई, 26 मे : माणसाच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं व्यसन नेहमीच समस्यांना आमंत्रण देतं आणि जर हे व्यसन पॉर्न फिल्म पाहण्याचं असेल तर ही गोष्ट खूपच गंभीर समस्या ठरू शकते. ही गोष्ट चकीत करणारी असली तर काही अंशी लोकांना अशा प्रकारचं व्यसन असतं. या व्यसनाची शिकार फक्त पुरुषच होतात असं नाही तर अनेक महिलांनाही अशाप्रकारचं व्यसन असू शकतं.

हॉलिवूड सेलिब्रिटी विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट हिनं तिच्या पॉर्न फिल्म पाहण्यासंबंधीच्या व्यसनाचा खुलासा नुकताच एका मुलाखतीत केला. जाडानं सांगितलं, 'अतिप्रमाणात पॉर्न फिल्म पहण्याच्या माझ्या सवयीमुळे मला खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यावेळी मला पॉर्न फिल्म पाहण्याचं व्यसन लागलं होतं. ज्याला मी सुरुवातीला गांभीर्यानं घेतलं नाही. मला वाटतं पॉर्नसोबत माझं अस्वस्थ असं नातं बनलं होतं. ज्यावर मी संयम बाळगण्याचा प्रयत्न करत होते पण मला ते शक्य होतं नव्हतं.'


जाडा पिंकेट पुढे सांगते, 'मी माझ्या आयुष्यातील कमी भरून काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र माझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. खरं तर पॉर्न पाहाणं वाईट गोष्ट नाही पण ही गोष्ट तुमच्या विचार आणि मनावर खूप परिणाम करते. पण या गोष्टीचा अतिरेक होतोय याची आपल्याला अजिबात कल्पनाही येत नाही.'

जाडा सांगते, 'पॉर्न पाहण्याचं व्यसन लागणं ही खरं तर खूप मोठी समस्या आहे. पण अनेक लोक त्याला समस्या मानत नाही.' पण मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, पॉर्न पाहण्याचं व्यसन तुमच्या मेंदूवर थेट परिणाम करतं आणि याची तीव्रता एवढी की, एखाद्या नशेच्या पेयाप्रमाणे ते तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर अंमल करतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 09:30 AM IST

ताज्या बातम्या