• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेता साई धरम तेजच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

अभिनेता साई धरम तेजच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

साई धरम तेज आपल्या बाईक वरून जात होता त्या दरम्यान त्याचा हा अपघात झाला.

 • Share this:
  मुंबई  11 सप्टेंबर : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता साई धरम तेज (Sai Dharam Tej) याचा शुक्रवारी रात्री मोठा अपघात झाला आहे. अपघातात तो गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. साई धरम तेज आपल्या बाईक वरून जात होता त्या दरम्यान त्याचा हा अपघात झाला. शुक्रवारी तो  बाईकवरून रात्री दुर्गमचेरुवु केबल ब्रिज पासून जात होता त्यावेळी त्याचा हा मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार साई धरम तेज एक स्पोर्ट्स बाईक (Sports Bike) चालवत होता. दरम्यान अभिनेत्याने हेल्मेट घातल होतं त्यामुळे त्याच्या डोक्याला इजा झाली नाही. मात्र इतरत्र त्याला इजा झाल्या आहेत. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची स्थिती सुधारल्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. (Sai Dharam Tej)
  View this post on Instagram

  A post shared by Sai Dharam Tej (@jetpanja)

  साई धमर तेजच्या टीमने सांगितल की, ‘साई आता ठीक आहे आणि तो रिकवर होतआहे. काळजीचं कारण नाही.  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती स्थिर झाल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी ऑपोलो रुग्णालयात दाखल केलं आहे.’
  View this post on Instagram

  A post shared by Sai Dharam Tej (@jetpanja)

  दरम्यान सोशल मीडियावर त्याचा अपघाताचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात पाहिलं जाऊ शकतं की साई धरम तेज ला शरिरावर डोळे, छाती, कंबर तसेच इतरत्र जखमा दिसत आहेत. अपघाताच्या बातमीनंतर अभिनेत्याचे कुटुंबीय ताबडतोब रुग्णालयात दाखल झाले होते.
  Published by:News Digital
  First published: