VIDEO Agnihotra 2 : 10 वर्षांपूर्वीच्या हिट TV मालिकेचा सीक्वेल; शरद पोंक्षेंचंही टीव्हीवर पुनरागमन

VIDEO Agnihotra 2 : 10 वर्षांपूर्वीच्या हिट TV मालिकेचा सीक्वेल; शरद पोंक्षेंचंही टीव्हीवर पुनरागमन

तीन पिढ्यांभोवती फिरणारी, गूढरम्या कथा सांगणारी अग्निहोत्र ही मालिका सुमारे 10 वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजली होती.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : तीन पिढ्यांभोवती फिरणारी, गूढरम्या कथा सांगणारी अग्निहोत्र ही मालिका सुमारे 10 वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजली होती. आता हीच मालिका नव्या रुपात पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येते आहे. स्टार प्रवाहवर येत्या 2 डिसेंबरपासून अग्निहोत्र 2 ही मालिका सुरू होत आहे. अग्निहोत्र मालिकेत शरद पोंक्षे यांची मोठी भूमिका होती. आता कॅन्सरसारख्या आजारावर मात करून शरद पोंक्षे या मालिकेतून टीव्हीवरदेखील पुनरागमन करत आहेत.

अग्निहोत्रची कथा एका वाड्याभोवती फिरणारी होती. विक्रम गोखले, मोहन जोशी, विनय आपटे, शरद पोंक्षे, शुभांगी गोखले, सुहास जोशी, मानसी मागीकर, डॉ. गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, ईला भाटे, लीना भागवत आदी दिग्गज कलाकार या मालिकेत होते आणि ही मालिका त्या वेळी प्रचंड लोकप्रिय होती. अभिनेते - दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. आता राजवाडे स्टार प्रवाह वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख आहेत.  अग्निहोत्र 2 च्या दिग्दर्शनाची जबाबदारी भीमराव मुडे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. अग्निहोत्र 2ची  कथा श्रीरंग गोडबोले यांचीच असून पहिल्या पर्वाचे लेखकही तेच होते.

अग्निहोत्रच्या नव्या पर्वात जुन्या कलाकारांबरोबर काही नवीन कलाकार दिसणार आहेत. अग्निहोत्र 1 मध्ये तीन पिढ्यांना जोडणारं कथासूत्र होतं. 2पुनर्जन्माचं गूढ यात होतं. मालिकेचा ट्रेलर रीलिज झाला असून त्यात शरद पोंक्षेंसह राजन भिसेसुद्धा नव्या भूमिकेत दिसतात. अग्निहोत्र 2 मध्ये काय कथा असेल आणि नवे कलाकार कोण असतील? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

येत्या 2 डिसेंबरपासून रात्री 10 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे.

First Published: Nov 13, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading