गेल्या वेळी चौथ्या नंबरवर असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका याही वेळी त्याच नंबरवर आहे. सिद्धीच्या हातून जंजिरा किल्ला घेण्याचा शंभूराजांचा प्रयत्न प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय.
अगदी गेल्या आठवड्यापर्यंत 'ही' मालिका टीआरपीच्या रेसमध्ये क्रमांक एकवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्येच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होईल.
मुंबई, 3 फेब्रुवारी : एखादी नवीन मालिका येते आणि टीआरपीच्या रेसमध्ये सर्वात पुढे जाण्यात काही काळातच यशस्वी होते. प्रत्यक्षात काहीच मालिकांबाबत असं घडतं. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात या मालिका लवकरच यशस्वी होतात. असच काहीसं झालं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या बाबतीत. 25 सप्टेंबर 2017 रोजी ही मालिका सुरू झाली होती. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये क्रमांक एकवर आहे. मात्र ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्येच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होईल.
टीआरपीनुसार गेले काही महिने टॉप 5 वर असणाऱ्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा शेवट अत्यंत भव्यदिव्य होणार असल्याची माहिती मिळते. छत्रपती संभाजी महाजांबाबत सामान्यांमध्ये असणारा आदर आणि कलाकारांनी वठवलेली प्रत्येक भूमिका यामुळे ही मालिका यशाच्या शिखरावर होती. या मालिकेतून अत्यंत रंजक पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य रेखाटण्याचा प्रयत्न केला होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका किंवा शंतनू मोघेंनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, या भूमिका या मालिकेचं विशेष आकर्षण ठरल्या. त्याचप्रमाणे प्राजक्ता गायकवाडने साकारलेले येसुबाईंची भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील 'एक प्रवास कधीच न विसरता येणारा' कॅप्शन देत ट्विटरवर संभाजी महाराजांच्या पेहरावातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये या मालिकेने 500 एपिसोड देखील पूर्ण केले होते. केवळ ‘संभाजी’ पाहण्यासाठी नित्यनियमाने रोज 9 वाजता मोठा प्रेक्षकवर्ग टीव्हीसमोर बसत असे. काही घरांमध्ये तर या मालिकेच्या वेळेनुसार इतर कामं आटोपली जात. आता या मालिकेच्या जागी कोणती मालिका येणार हे मात्र गुलदस्त्यात आहे
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.