Home /News /entertainment /

'ही बघा स्वस्तातली किम कार्दशियन', ब्लॅक बॉडीसूटवरून Poonam Pandey होतेय ट्रोल

'ही बघा स्वस्तातली किम कार्दशियन', ब्लॅक बॉडीसूटवरून Poonam Pandey होतेय ट्रोल

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या बोल्ड आणि न्यूड (Poonam Pandey latest Photo) फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.

  मुंबई, 22 डिसेंबर-अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या बोल्ड आणि न्यूड (Poonam Pandey latest Photo) फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी पूनम पांडे वरपासून खालीपर्यंत बॉडीसूटमध्ये झाकलेली दिसली. ब्लॅक कलरच्या या बॉडीसूटमध्ये पूनम पांडेची फिगर दिसत आहे. पूनम पांडेच्या या ड्रेसवर यूजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. यासोबतच तिची तुलना टीव्ही स्टार आणि बिझनेसवुमन किम कार्दशियनशीही केली जात आहे. यूजर्स करत आहेत कमेंट पूनम पांडेच्या या फोटोंवर यूजर्स एकामागून एक कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे, बेस्ट काय आहे? बॉडी वॉर्मर घातलण्याने कोण स्टायलिश होत नाही.. काहीही.. तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे, "स्विमिंग आउटफिट, तेही विमानतळावर?" आणखी एका यूजरने लिहिले की, "स्वस्तामधील किम कार्दशियन" वाचा-पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या वागणुकीमुळे शक्तिमान फेम वैष्णवी महन्त नाराज पूनम पांडेही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केले. त्यानंतर तिने सॅमवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि त्यासाठी त्याला अटकही झाली.एएनआयच्या वृत्तानुसार, यामुळेपूनम पांडेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माहिती समोर आली होती. तिच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी सांगितले की, सॅम बॉम्बेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर आयपीसीची अनेक कलमे आहेत. पण नंतर सॅम बॉम्बे जामिनावर तुरुंगातून बाहेर आला.
  नुकतीच पूनम पांडे राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत होती. पूनम पांडेने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. पूनम पांडेने राज कुंद्राविरुद्ध चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पूनमने अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या